Eknath Shinde : जागा वाटप योग्य पद्धतीने होईल, शिवतारेंना युती धर्म पाळावाच लागणार!

Eknath Shinde : जागा वाटप योग्य पद्धतीने होईल, शिवतारेंना युती धर्म पाळावाच लागणार!

Eknath Shinde On Vijay Shivtare : महायुतीचं जागावाटप हे समन्वयाने होणार आहे. कसलंही टेन्शन घेऊ नका. जागावाटपाबद्दल महायुतीमध्ये कोणताही वाद नाही. जागावाटपाचा निर्णय योग्यवेळी होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर शिवसेना नेते विजय शिवतारे (vijay shivtare)यांनी अजितदादांविरोधात (Ajit Pawar)भूमिका घेतली आहे. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, विजय शिवतारे यांना धर्म पाळावाच लागणार आहे. त्यामुळे ज्या ज्या भागात महायुतीचा जो उमेदवार असेल त्याला पूर्णपणे ताकतीने निवडून आणणार असल्याचेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

‘कालची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग’; CM शिंदेंनी ‘इंडिया’ आघा़डीची खिल्ली उडवली

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महायुतीत जागावाटपावरुन कोणतेही मतभेद नाहीत. योग्य वेळी जागावाटपाचा निर्णय जाहीर केला जाईल. त्याचवेळी शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी इच्छूक आहेत. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, विजय शिवतारे याच्याशी माझं बोलणं झालं आहे.

चार महिन्यांचा मुलगा थेट कोट्यधीश! Narayan Murthy यांच्याकडून नातवाला 240 कोटींचे शेअर्स गिफ्ट

आम्ही शिवतारे यांना सांगितले आहे की, आपली राज्यात महायुती आहे. त्यामुळे युतीधर्म पाळणं हे आपलं शिवसेनेचं कर्तव्य आहे. त्याप्रमाणे विजय शिवतारे काम करणार आहेत. त्यांची तब्येत सध्या ठीक नाही. त्यामुळे आता महायुतीमध्ये शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते पूर्ण ताकतीने जिथे ज्यांचा उमेदवार असेल त्याला निवडून आणणार आहेत.

त्याचवेळी रविवारी मुंबईमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता झाली. त्यानंतर इंडिया आघाडीची सभा मुंबईतील शिवाजी पार्कवर झाली. त्या सभेवरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टीका केली आहे. त्यानंतर आता माजी मंत्री विजय शिवतारे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय मान्य करणार का? हे पाहावे लागणार आहे.

त्यानंतर आता माजी मंत्री विजय शिवतारे यांनी एक ट्वीट केलंय, त्यात त्यांनी म्हटले आहे की, काही वृत्तवाहिन्या मी माघार घेतल्याच्या बातम्या प्रसारीत करत असल्याचे समजले. हे वृत्त पूर्णत: खोटे असून मी बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेसोबत चर्चा करुनच निर्णय घेईल असे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळवले आहे. त्यामुळे आता विजय शिवतारे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश पाळणार की नाही? हे देखील पाहावे लागणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज