Eknath Shinde : जखमींना भेटण्यासाठी CM शिंदे रुग्णालयात; म्हणाले, झालेली घटना..

Eknath Shinde : जखमींना भेटण्यासाठी CM शिंदे रुग्णालयात; म्हणाले, झालेली घटना..

Eknath Shinde : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या (Ganpat Gaikwad) गोळीबारात शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी रुग्णालयात येऊन जखमींची विचारपूस केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत यावर भाष्य केले. शिंदे म्हणाले, झालेली घटना अत्यंत दु्र्दैवी आहे. या घटनेतून बचावलेले महेश गायकवाड लवकरात लवकर बरे व्हावेत अशी भावना व्यक्त केली. यानंतर शिंदे यांनी डॉक्टरांशी चर्चा केली तसेच गायकवाड यांच्या प्रकृतीची माहिती घेतली.

मोठी बातमी! ‘गोळीबार’ प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांना अटक; रिव्हॉल्वर जप्त

नेमकं काय घडलं ? 

उल्हासनगरच्या द्वारली गावातील जागेवरून गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यात वाद सुरू होता. हिल लाईन पोलिसांनी काल दोघांनाही बोलावलं होतं. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी सात वाजता दोघेही पोलीस ठाण्यात हजर झाले. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सु्मारास दोघांतील वाद विकोपाला गेला. गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. या गोळीबारात महेश गायकवाड यांचे मित्र राहुल पाटील सुद्धा जखमी झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्येच गोळीबाराची घटना घडली. महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात येऊन त्यांच्या शरीरातून सहा गोळ्या काढण्यात आल्या.

कडक कारवाई करणार : फडणवीस 

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. पोलीस ठाण्यात झालेल्या गोळीबारामागे काय सत्य आहे याचा शोध आपल्याला घ्यावा लागेल. त्यामुळे या प्रकरणाचे वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना देण्यात आले आहेत. या प्रकरणी अत्यंत कडक कारवाई केली जाईल, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

Sharad Pawar : ‘कायदा हातात घेणाऱ्यांना मोकळीक’ ‘गोळीबारा’च्या घटनेवर शरद पवारांचे सरकारला खडेबोल

follow us
  • fb
  • instagram
  • youtube