Ajit Pawar : पार्थ, गजा मारणे भेट चुकीचीच; अजितदादा करणार कानउघडणी
पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात मोठी दहशत (Pune News) माजवणारा कु्ख्यात गुंड गजा मारणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार (Partha Pawar) यांची भेटीचा फोटो समोर आला होता. यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर अखेर आज (दि.26) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात प्रजासत्ताक दिनानंतर पत्रकारांशी बोलत होते.
‘ठाकरेंचे सरकार पडणार होतं तेव्हाच आम्ही सर्वांनी…’; अजित पवारांचा मोठा खुलासा
पार्थ आणि गजा मारणे यांच्या भेटीवर बोलताना अजित पवार म्हणाले की, पार्थ पवार यांनी गुंड गजा मारणे यांच्यातील भेट अत्यंत चुकीची घटना आहे. भविष्यात असं काही घडू नये यासाठी मी पार्थला भेट झाल्यानंतर सांगणार असल्याचे अजितदादांनी सांगितले. जे कार्यकर्ते होते ते त्याला घेऊन गेले होते. त्या ठिकाणी मारणे उपस्थित होता असे सांगितले जात आहे. याबाबत मी माहिती घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
भेटीचं कारण गुलदस्त्यात
लोकसभा निवडणुका अगदी जवळ आलेल्या असतानाच पार्थ पवार आणि गुंड गजा मारणे यांची भेट झाल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. सध्या या भेटीची जोरदार चर्चा सुरू असून, ही भेट आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) अनुषंगानेच होती का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, या भेटीमागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे माजी नगरसेविका आहेत, त्यादेखील यावेळी उपस्थित होत्या.
कोण आहे गजा मारणे
पुण्यातील गुन्हेगारी जगतात मोहोळ आणि मारणे टोळ्यांचा मोठा दबदबा राहिला आहे. गजा उर्फ महाराज उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे याचा जन्म मुळशी तालुक्यातील गावात झाला होता. यानंतर तो पुण्यातील शास्त्रीनगर येथे राहण्यासाठी आला. मात्र येथूनच त्याचा गुन्हेगारी विश्वातील प्रवास सुरू झाला. सध्या पुण्यात ज्या टोळ्यांची दहशत आहे त्यात मारणे टोळीचं नाव आघाडीवर आहे. घायवळ गँग आणि मारणे गँग यांच्यातील वर्चस्वाचा वादही सर्वश्रुत आहे. याआधी खून प्रकरणात गजा मारणेला अटकही झाली होती. या खून प्रकरणात मारणे तीन वर्षे येरवडा कारागृहात बंद होता.
गजा मारणेविरोधात खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, दहशत माजवणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. पुण्यातील एका मोठ्या व्यावसायिकाला खंडणी मागितल्याच्या प्रकरणात त्याला मागील वर्षी न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. तेव्हापासून गजा मारणे बाहेर आहे. गजा मारणे हा मारणे टोळीचा म्होरक्या असून या टोळीवर आतापर्यंत 23 हून आधिक गुन्हे दाखल आहेत. गजा मारणेवरही सहा पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. गजा मारणे ज्यावेळी तळोजा कारागृहातून बाहेर पडला त्यावेळी 300 चारचाकी वाहनांची मोठी रॅली काढण्यात आली होती. तेव्हा या रॅलीची राज्यभरात मोठी चर्चा झाली होती.
माझी झोपेतच सही घेतलीयं, दुरुपयोग झाल्यास माझ्याशी गाठ; मनोज जरांगेंचा कडक शब्दांत इशारा
मराठा आरक्षणावर चर्चेतून तोडगा निघेल
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे भांगे नावाचे सेक्रेटरी जरांगेंशी चर्चा करत आहेत. या चर्चेत विधी आणि न्याय खात्याचेही काही अधिकारी आहेत. चर्चेतून तोडगा निघत असतो याप्रश्नावरही चर्चेतूनच तोडगा निघेल असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला. तसेच आपला मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा असल्याचेही यावेळी अजितदादांनी स्पष्ट केले.
अजितदादा स्टाईलने सोडलं रोहित पवारांवर टीकास्त्र
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची नुकतीच ईडी चौकशी करण्यात आली. यावेळी शरद पवार यांच्या नेत्याकडून ज्याप्रकारे भाष्य आणि इव्हेंट करण्यात आला त्यावर त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, माझीदेखील एसीबीने चौकशी केली होती पण, आम्ही कधी त्याचा इव्हेंट केला नाही. चौकशीला गेल्यानंतर कुणी काय करायचं किंवा काय आरोप करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.