‘कालची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग’; CM शिंदेंनी ‘इंडिया’ आघा़डीची खिल्ली उडवली

‘कालची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग’; CM शिंदेंनी ‘इंडिया’ आघा़डीची खिल्ली उडवली

Eknath Shinde On India Allinace : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर ‘इंडिया’ आघाडीची (India Alliance) काल मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर सभा पार पडली. या जाहीर सभेतून काँग्रेस नेते राहुल गांधी, (Rahul Gandhi) शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह इतर नेत्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज प्रत्युत्तर दिलं आहे. कालची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग असल्याचं म्हणत शिंदेंनी इंडिया आघाडीची खिल्लीच उडवली आहे. मुंबईतून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

लोकांची कामे करण्यात ‘त्यांना’ स्वारस्य नाही, हेलपाटे मारायला लावण्यातच मजा….; विखेंची थोरातांवर टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कालची सभा ही फॅमिली गॅदरिंग होती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. उत्तर प्रदेश काश्मीर बिहारमधून जे नेते तडीपार झाले आहेत. या नेत्यांना लोकांनी तडीपार केले आहे. सगळे काल एकत्र आले होते. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं की हे धरुन बांधून आणलेत हे दुर्देव आहे. कालचा काळा दिवस होता. सावरकरांच्या स्मारकासमोर आणि बाळासाहेबांच्या समाधीसमोर ही सभा झाली आहे. ठाकरे गटाने आधी जाऊन माफी मागितली पाहिजे होती. सावरकरांविरोधात बोलणाऱ्यांसोबत बोलावं लागतं, स्टॅलिन, मुफ्ती मोहम्मद, फारुख अब्दुल्ला यांच्यासोबत बसायचं म्हणून त्यांनी माफी मागितली पाहिजे, कालच्या सभेत माझ्या तमाम हिंदू बांधव हा शब्द रद्द झाला असल्याची सडकून टीकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकराचं ‘मविआ’सोबत पक्कं होणार, राहुल गांधींना दिलं जेवणाचं आमंत्रण

तसेच माझ्या तमाम हिंदू बांधवांनो हा शब्द कालपासून बंद झाला आहे. बाळासाहेबांचे ध्येय, उद्देश, भूमिका, धोरण उद्धव ठाकरे यांनी सोडल्यानेच आम्हाला त्यांना सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. ‘अबकी बार तडीपार’ त्यांनाच जनतेने केले आहे. इतर राज्यातून तडीपार झालेले लोकं इथं आले ते मोदींना कसेकाय तडीपार करु शकतात? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube