सांगलीच्या बदल्यात ठाकरेंना ‘जालना’ मिळाला : जागा देतानाच राहुल गांधींनी उमेदवारही दिला!

सांगलीच्या बदल्यात ठाकरेंना ‘जालना’ मिळाला : जागा देतानाच राहुल गांधींनी उमेदवारही दिला!

जालना : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला गेलेला सांगली लोकसभा मतदारसंघ (Sangli Lok Sabha Election) पुन्हा एकदा काँग्रेसकडे आला आहे. आता सांगलीच्या ऐवजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला काँग्रेसच्या (Congress) ताब्यातील जालना लोकसभा मतदारसंघ (Jalna Lok Sabha constituency) देण्यात आला आहे. मतदारसंघासोबतच काँग्रेसने संजय लाखे पाटील (Sanjay Lakhe Patil) यांच्यारुपाने उमेदवारही ठाकरेंना दिला आहे. त्यामुळे जालन्यात आता भाजपच्या रावसाहेब दानवे विरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संजय लाखे पाटील यांच्यात लढत होणार आहे. (Instead of Sangli, Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) has been given Jalna Lok Sabha constituency held by Congress)

भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त काँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्रात आहेत. या दरम्यान, गुरुवारी (14 मार्च) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी नाशिकमध्ये त्यांची भेट घेऊन जागावाटपावर चर्चा केली होती. यावेळी राऊत यांच्या माध्यमातून गांधी यांनी ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. या चर्चेत कोल्हापूर, सांगली व भिवंडी या जागा काँग्रेससाठी सोडण्यास शिवसेना तयार झाली. तर जालना ठाकरेंना मिळाला आहे.

लोकसभेचे बिगुल वाजले; देशात सात टप्प्यात मतदान, चार जूनला होणार मतमोजणी

मिळालेल्या माहितीनुसार, या जागेवर ठाकरेंनी सुरुवातीला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना उभे राहण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, त्यांनी नकार दिल्याने पक्षाकडे प्रभावी उमेदवार नसल्याची अडचण ठाकरेंनी राहुल गांधी यांना सांगितली. त्यावर काँग्रेसच्याच नेत्याला तुमच्याकडे पाठवितो, असे म्हणत गांधींनी जालनातील मराठा समाजातील प्रभावी नेते आणि काँग्रेसचे सरचिटणीस संजय लाखे-पाटील यांचे नाव सुचविले. त्याला ठाकरेंनी संमती दिल्यानंतर राहुल यांच्याकडून लाखे- पाटील यांना शिवसेना प्रवेशाच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार लाखे- पाटील यांनी शुक्रवारी माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

जालनामध्ये भाजपची ताकद :

सांगलीप्रमाणेच जालना हाही मतदारसंघात काँग्रेसकडेच होता. तर युतीत ही जागा नेहमीच भाजपने लढवली आहे. यात 1996 पासून या मतदारसंघात भाजपने एकहाती विजय मिळविला आहे. त्यात 1996 आणि 1998 भाजपच्या उत्तमसिंह पवार यांनी तर 1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 असे सलग पाचवेळा इथून भाजपच्या रावसाहेब दानवे यांनी विजय संपादन केला आहे. त्यापूर्वी 1977 साली पुंडलिक हरी दानवे जनता पक्षाकडून विजयी झाले होते.

देशात ९७ कोटी मतदार, १.८२ कोटी तरुण प्रथमच बजावणार मतदानाचा हक्क; निवडणूक आयुक्तांची माहिती

तर 1980 आणि 1984 मध्ये काँग्रेस (आय)चे बाळासाहेब पवार विजयी झाले. 1989 साली भारतीय जनता पक्षाचे पुंडलिक हरी दानवे पुन्हा विजयी झाले. 1991 साली काँग्रेसचे अंकुशराव टोपे यांनी विजय संपादन केला होता. मात्र काँग्रेसचीही या मतदारसंघात चांगली ताकद असल्याचे दिसून येते. 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांत काँग्रेस उमेदवार विलास औताडे यांनी साडेतीन लाखांहून अधिक मतेही घेतली आहेत. त्यामुळे आपली ही जागा काँग्रेसने शिवसेनेला देऊ केली.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज