देशात ९७ कोटी मतदार, १.८२ कोटी तरुण प्रथमच बजावणार मतदानाचा हक्क; निवडणूक आयुक्तांची माहिती

देशात ९७ कोटी मतदार, १.८२ कोटी तरुण प्रथमच बजावणार मतदानाचा हक्क; निवडणूक आयुक्तांची माहिती

Chief Election Commissioner Rajiv Kumar PC: आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024 ) पार्श्वभूमीवर आज केंद्रीय निवडणूकाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमा (Rajiv Kumar) यांनी सध्या पत्रकार परिषद सुरू आहे. ते काहीच वेळात निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करणार आहेत. दरम्यान, या पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी त्यांनी भारतात लोकशाही हा सर्वात मोठा उत्सव आहे, असं सांगितलं. या पत्रकार परिषदते त्यांनी मतदारांची आकडेवारीही जाहीर केली. यावर्षी भारतात 96 कोटी 80 लाख मतदार असल्याचं ते म्हणाले.

Government Schemes : विद्युतचलित कडबाकुट्टी यंत्र वापरासाठी अनुदान योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल? 

आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी भारतात 96 कोटी 80 लाख मतदार आहेत. 19 कोटी 74 लाख युवा मतदार आहेत. या तरुणांची मतांचा मोठा वाटा या निवडणूकीत असणार आहे. तरुण मतदार हे भारताच्या लोकशाहीचे बलस्थान आहेत. देशभरातील नागरिक मतदान करतीलच. पण तरुण हे आपल्या लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे. ते मोठ्या प्रमाणावर मतदान करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मालमत्तांचे नुकसान करणाऱ्यांवर आणखी कठोर कारवाई : हिंसक आंदोलनांनंतर शिंदे सरकारचा मोठा निर्णय 

1.82 कोटी नवीन मतदार
1.82 कोटी नवीन मतदारांची नोंदणी झाली असून हे मतदार यावर्षी पहिल्यांदाचा मतदान करणार आहेत. तर 18 ते 29 वयोगटातील 21.50 कोटी मतदार आहेत. 82 लाख मतदार हे 85 वयापेक्षा अधिक असल्याचं निवडणूक आयुक्तांना सांगितलं.

महिला मतदारांची संख्या अधिक
देशातील 12 राज्यांमध्ये पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या वाढली आहे. त्यांच्या मतांचा निवडणुकीवर मोठा प्रभाव पडेल यात शंका नाही, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनीही म्हटले आहे.

पुढे बोलताना राजीव कुमार म्हणाले की, गेल्या वर्षी 11 निवडणुका झाल्या. या निवडणुका राज्यांसाठी होत्या. त्या शांतते पूर्ण झाल्याबद्दल आम्हाला समाधान आहे. आता त्याच पद्धतीने लोकसभा निवडणुका घेण्याचा आमचा प्रयत्न असेल, असं निवडणुक आयुक्त म्हणाले.

मतदान केंद्रावर सर्व सुविधा असतील, असेही ते म्हणाले. ज्येष्ठ नागरिक मतदानासाठी येतील तेव्हा व्हील चेअर आणि अटेंडंटची व्यवस्था असेल. अशा नागरिकांच्या घरी जाऊन त्यांची मते घेण्यास आम्ही तयार आहोत,असं राजीव कुमार यांनी सांगितलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube