‘भारतात हे शक्य नाही …’, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचे थेट इलॉन मस्कला प्रत्युत्तर

‘भारतात हे शक्य नाही …’, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचे थेट इलॉन मस्कला प्रत्युत्तर

Rajiv Kumar On Elon Musk : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी तारखांची घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली विधानसभेच्या (Delhi Assembly Election) सर्व 70 जागांसाठी एकाच टप्प्यात 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे तर 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीसाठी तारखा जाहीर करण्यापूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी ईव्हीएम (EVM) मशीनवरून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क (Elon Musk) यांना उत्तर दिले आहे. ईव्हीएम कोणत्याही प्रकारे हॅक करता येणार नाही. असं म्हणत त्यांनी इलॉन मस्क यांना उत्तर दिले.

काही दिवसांपूर्वी इलॉन मस्क यांनी भारतातील निवडणुकांदरम्यान ईव्हीएम हॅक होऊ शकतात आणि त्यांचा ईव्हीएम विश्वास नाही, असे म्हटले होते. यावर आज उत्तर देत जो व्यक्ती असे म्हणत आहे, त्यांच्या स्वत:च्या देशात ईव्हीएम वापरले जात नाही. त्यांच्या देशात मतदान वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक पद्धतींद्वारे केले जाऊ शकते. तिथली मशिन्स इंटरनेटशी जोडलेली आहेत पण भारतात हे शक्य नाही. अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. तसेच भारतातील ईव्हीएममध्ये छेडछाड करता येणार नाही, असे ते म्हणाले.

पुढे बोलताना राजीव कुमार म्हणाले की, इलॉन मस्क यांनी अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी बॅलेट पेपरद्वारे निवडणूक घेण्याची मागणी केली होती. मात्र त्यांनीच काही दिवसापूर्वी भारतातील मतमोजणीचे कौतुकही केले होते. असं देखील ते म्हणाले. अमेरिकेतील निवडणुकीच्या मतमोजणीवर प्रश्न उपस्थित करताना मस्क यांनी भारताचे उदाहरण दिले होते की, तिथे एका दिवसात मतमोजणी कशी होते, तर अमेरिकेत एक ते दीड महिना लागतो. असं इलॉन मस्क म्हणाले होते.

महायुतीत मनसेची एन्ट्री शिंदेंच्या आडमुठ भूमिकेमुळे फिस्कटली; कार्यकर्त्यांचं ठाकरेंसमोर खळ्ळखट्याक

तर दुसरीकडे इलॉन मस्क यांनी 15 जून 20224 रोजी केलेल्या ट्विटमध्ये ईव्हीएमचा वापर बंद करण्यात यावा, असे म्हटले होते. हे कोणत्याही मानवी किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (AI) हॅक केले जाऊ शकते. असं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube