पाकिस्तान सरकारचा इलॉन मस्कला मोठा धक्का; यूजर्सच्या X वापरावर घातली बंदी

पाकिस्तान सरकारचा इलॉन मस्कला मोठा धक्का; यूजर्सच्या X वापरावर घातली बंदी

Pakistan Bans x : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमधील (Pakistan) सोशल मीडिया युजर्संना एक्स हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरण्यात अडचणी येत होत्या. अनेक युजर्संनी त्यासंबंधी तक्रारी देखील दाखल केल्या होत्या. एक्सकडे दरम्यान, आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली आहे.

‘…तेव्हा आम्हीही सगळ्या गोष्टींचा खुलासा करणार’; राजेंद्र पवारांचा अजितदादांना थेट इशारा 

पाक सरकारनेक्सवर तात्पुरती बंदी घातली आहे. पाकिस्तान सरकारने राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत X वर ही बंदी घातली आहे. रॉयटर्सने सांगितले की, Twitter/X च्या पाकिस्तान सरकारच्या कायदेशीर निर्देशांचे पालन करण्यात आणि त्याच्या प्लॅटफॉर्मच्या गैरवापराबद्दलच्या चिंतांचे निराकरण करण्यात अयशस्वी झाल्यामुळे ही बंदी लादली.

12th Fail In Chaina: चीनमध्ये 20 हजार स्क्रीनवर रिलीज होणार विक्रांत मॅसीचा ‘ट्वेल्थ फेल’ 

या वर्षी फेब्रुवारीमध्ये, अनेक पाकिस्तानी युजर्संनी इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर X चा वापर करण्यात अडथळे येत असल्याचं सांगितलं होतं. अहवालानुसार, पाकिस्तान सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून एक्सवर बंदी घातल्याचं सांगितलं. मात्र, X वर बंदी घालण्यासाठी सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

सुरक्षेचे कारण सांगत बंदी
पाकिस्तानी न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात सरकारने म्हटले आहे की, ‘येथे नमूद करणे आवश्यक आहे की, ट्विटर/एक्सने पाकिस्तान सरकारच्या कायदेशीर सूचनांचे पालन न केल्यामुळे बंदी लादणे आवश्यक आहे. दरम्यान, अद्याप X ने या प्रकरणी कोणतेही निवेदन जारी केलेले नाही.

पाकिस्तानमध्ये 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान तेथील सरकारने अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ब्लॉक केले होते. मतदानाच्या दिवशी संपूर्ण पाकिस्तानमध्ये इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात आली होती. तथापि, निवडणुकीनंतर, अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पूर्वीप्रमाणेच काम करू लागले. परंतु X युजर्संना ते वापरण्यात अडचणी येऊ लागल्या.

पाकिस्तानच्या सिंध उच्च न्यायालयानेही तेथील दूरसंचार प्राधिकरणाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ची सेवा पूर्ववत करण्याचे आदेश दिले होते, परंतु सरकारने X ची सेवा पुन्हा सुरू केलेली नाही. आता सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून X हा प्लॅटफॉर्म राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube