Viral Video : पाकिस्तानमधील महागाईवर बोलताना इम्रान खानचं अजब विधान; म्हणाले, “तुपाची किंमत…”

Viral Video : पाकिस्तानमधील महागाईवर बोलताना इम्रान खानचं अजब विधान; म्हणाले, “तुपाची किंमत…”

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी (Pakistan Former) पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan ) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओमध्ये तो पाकिस्तानमधील तुपाची किंमत सांगत आहे. व्हिडिओमध्ये इम्रान खान सांगत असलेल्या तुपाची किंमत ऐकून तुमचेही डोके चक्रावून जाणार आहे. इम्रान खानचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या व्हिडिओची खिल्ली उडवली.

इम्रान खानचा हा व्हायरल झालेला व्हिडिओ सुमारे ८ सेकंदांचा आहे. पाकिस्तानी पत्रकार नाइला इनायतने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओची क्लिप दुसर्‍या व्हिडिओमधून कट करण्यात आली. या व्हिडिओमध्ये इम्रान खान आपल्या देशात तुपाची किंमत सांगताना ऐकू येत आहेत.

६०० अब्ज रुपये प्रति किलो तूप 

या व्हिडिओमध्ये इम्रान खान त्यांच्या सरकारच्या कार्यकाळातील तुपाच्या किमती आणि सध्याच्या सरकारची तुलना करत आहेत. इम्रान खान म्हणतात, जे तूप ३८० अब्ज होते ते आज ६०० अब्ज किलोपर्यंत पोहोचले आहे.

पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट

आज पाकिस्तानची आर्थिक स्थिती काय आहे, हे कोणापासून लपून राहिलेले नाही. तूप सोडा… पाकिस्तानी लोक मोठ्या कष्टाने दोन वेळची भाकरी मिळणे कठीण झाले. महागाईने होरपळलेल्या पाकिस्तानी जनतेला गुरुवारी सकाळी आणखी एक झटका बसला. पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर देखील वाढले.

पेट्रोल २७२ रुपये प्रतिलिटर 

पाकिस्तानमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांनी विक्रमी पातळी गाठली. सरकारने गुरुवारपासून पेट्रोल २२ रुपयांनी तर डिझेल १७ रुपयांनी वाढवले ​​आहे. आजपासून एक लिटर पेट्रोलची किंमत आता १७२ रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत २८० रुपये आहे. अशाप्रकारे गेल्या महिनाभरात पेट्रोल ५८ रुपयांनी तर डिझेल ५३ रुपयांनी महागले आहे. १६ जानेवारीला पेट्रोलचा दर २१४.८० रुपये तर डिझेलचा दर २२७.८० रुपये होता.

पाकिस्तानच्या वित्त विभागाने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत झालेल्या विक्रमी वाढीचे पाकिस्तानी चलन (रुपया) च्या घसरणीला दिले आहे. सध्या पाकिस्तानमध्ये परकीय चलनाचे मोठे संकट आहे. त्यामुळे आयात-निर्यातीवर परिणाम होत आहे. महागाई वाढत आहे. IMF कर्ज देत नाहीय. आयएमएफची टीम ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत पाकिस्तानात होती. यादरम्यान सुमारे 10 दिवस कर्जाबाबत दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू होती. असे असूनही, पाकिस्तान बेलआउट पॅकेजबाबत आयएमएफशी कोणताही करार अंतिम करू शकला नाही. आयएमएफचे अधिकारी नॅथन पोर्टर म्हणाले की, आगामी काळातही या विषयावर पाकिस्तानशी आभासी चर्चा सुरूच राहणार आहे. आतापर्यंत कोणत्याही करारावर स्वाक्षरी झाली नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube