‘…तेव्हा आम्हीही सगळ्या गोष्टींचा खुलासा करणार’; राजेंद्र पवारांचा अजितदादांना थेट इशारा

‘…तेव्हा आम्हीही सगळ्या गोष्टींचा खुलासा करणार’; राजेंद्र पवारांचा अजितदादांना थेट इशारा

Rajendra Pawar On Ajit Pawar : कुटुंबात अजितदादांनी राजकीय अन् आम्ही सामाजिक भूमिका पार पाडायची असं ठरलेलं, याचा अर्थ प्रत्येकवेळी मीच केलं असं नाही, योग्यवेळी आम्ही खुलासा करणार असल्याचं म्हणत बारामती अॅग्रोचे राजेंद्र पवार (Rajendra Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना थेट इशाराच दिला आहे. दरम्यान, अजितदादांकडून पवार कुटुंबियांवर सडकून टीका जात असल्याचं पाहायला मिळालं. त्यावर बोलताना राजेंद्र पवारांनी भूमिका मांडली.

आमचं नाव न घेणाऱ्याला असं इंजेक्शन टोचा की… डॉक्टरांच्या मेळाव्यात अजित पवारांचं वक्तव्य

राजेंद्र पवार म्हणाले, अजित पवारांपेक्षा आम्ही बारामतीत जास्त राहतो. सामाजिक कामे आम्हीही करतो, अजित पवार राजकीय जीवनात कार्यरत असून अजित पवार यांनी राजकीय भूमिका पार पाडायची आणि आम्ही सामाजिक कामे करायचे ठरलं आहे. याचा अर्थ प्रत्येक वेळेस मीच केले, मीच केले, असं ते म्हणू शकत नाहीत, योग्य वेळ येईल तेव्हा आम्हीही सगळ्या गोष्टींचा खुलासा करणार असल्याचं राजेंद्र पवार म्हणाले आहेत.

अजित पवारांची टीका…
बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत होत आहे. त्यावरुन पवार कुटुंबियांमध्ये टीका-टीप्पणी केली जात आहे. अशातच
नुसती भाषणे देऊन विकास होत नसतो,’ अशी टीका अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली होती.

अजितदादांच्या टीकेला प्रत्युत्तर
जो विकास झाला जो निधी आला तो एकत्रित होता. त्यात शरद पवार व सुप्रिया सुळेंचाही निधी होताच. अजित पवार राज्य सरकारमध्ये असल्याने त्यांचा अधिकचा निधी आला असेल पण, स्वयंपाक सगळ्यांनी मिळून केला होता, वाढप्याकडे वाढायचे काम दिलेले होते; वाढपी वाढतोय याचा अर्थ सगळा स्वयंपाक त्याने एकटयानेच केलाय, असा कदाचित त्यांचा समज झाला असावा, असा खोचक टोलाही राजेंद्र पवारांनी अजितदादांना लगावला आहे.

मोरगावात लोकांशी तासभर का बोलावं लागतं?
मागील निवडणुकीत आम्ही रोहित पवार यांच्यासाठी कर्जत-जामखेड मतदारसंघात जोर लावत होतो. आधीच्या निवडणुकांमध्येही आम्ही गाव ते घर असा प्रचार करीत होतो. छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीपासून प्रचार करतो. एक दोन निवडणुकीत आम्ही नसलो, तर 35 वर्षातील निवडणुकीतच आम्ही नाही, असे ते म्हणणार असतील तर मग काय बोलायचं. त्यांच्यासारख्या राज्यस्तरीय नेत्याला मोरगावमध्ये तासभर लोकांशी का बोलाव लागत याचे उत्तर त्यांनीच द्यावे, असा सवालही राजेंद्र पवार यांनी अजित पवार यांना केलायं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज