‘बारामती’कराचं निनावी पत्र, अजितदादांना रोखठोक उत्तर; राजेंद्र पवार म्हणतात, जेव्हा दबावातून…

‘बारामती’कराचं निनावी पत्र, अजितदादांना रोखठोक उत्तर; राजेंद्र पवार म्हणतात, जेव्हा दबावातून…

Pune News : राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट आणि त्यातून पवार कुटुंबात निर्माण होत असेलला राजकीय संघर्ष सर्वाधिक चर्चेत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोनच दिवसांपूर्वी खुलं पत्र लिहित आपण महायुतीत सहभागी का झालो याचं उत्तर दिलं होतं. त्यानंतर आता आणखी एक निनावी पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. अजित पवार यांनी लिहिलेल्या पत्राला हे उत्तर असल्याची चर्चा सुरू आहे.

‘बारामतीकरांची भूमिका’ या नावानं हे पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. बारामतीकरांच्या नावानं हे पत्र असलं तरी ते अजित पवार यांच्यावर टीका करणारं आहे. तसेच पत्राच्या शेवटी वाजवा ‘तुतारी गाडा गद्दारी’ असा स्पष्ट उल्लेख आहे. या पत्रातून पवार कुटुंबातील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. या निनावी पत्रात अजितदादांनी बंड का केलं याचं कारण देण्यात आलं आहे तसेच तिसऱ्या पिढीत पार्थ पवार यांच्याऐवजी रोहित पवार यांची निवड केल्यापासून अजितदादा आणि पवार कुटुंब यांच्यातील अंतर वाढत गेल्याचा दावा या पत्रात करण्यात आला आहे.

पत्रात नेमकं काय ?

पवारांच्या घरात शेतकरी कामगार पक्षाचं राजकारण होतं. पण शरद पवारांचा ओढा काँग्रेसकडे होता. याच पक्षात ते पुढे जात राहिले आणि आप्पासाहेबांनी शेतीकडे मोर्चा वळवला. पुढील पिढी तयार झाली तेव्हा स्व. अनंतरावांचा मुलगा अजित आणि आप्पासाहेबांचा मुलगा राजेंद्र यांपैकी कुणाला राजकारणात पाठवायचे याचा विचार सुरू होता. तेव्हा दोन्ही भावांनी अनंतरावांच्या मुलासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून राजेंद्र पवारांची क्षमता असून देखील अजित पवारांना पुढे केले.

हिमाचल प्रदेशमध्ये ‘हायव्होल्टेज ड्रामा’ : 6 आमदारांनी सोडली काँग्रेसची साथ, CM सुख्खूंचा राजीनामा

दोघांनीही त्यांना वेळोवेळी सांभाळून देखील घेतले. तेव्हा राजेंद्र पवारांनी बंड केलं नाही. पुढे तिसऱ्या पिढीत पार्थ की रोहित अशी निवड करायची ठरली तेव्हा आप्पासाहेबांचा थेट वारसदार म्हणून रोहितची निवड करून अप्रत्यक्षपणे राजेंद्र पवारांना न्याय देण्यात आला. तिथपासून खरा जळफळाट सुरू झाला होता. सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर धाराशिवच्या काड्या पेटल्या आणि तोफांना बत्त्या लागल्या. म्हणूनच सामान्य बारामतीकरांची हीच भूमिका आहे की वाजवा तुतारी गाडा गद्दारी असे या पत्रात म्हटले आहे.

काय म्हणाले राजेंद्र पवार ?

जेव्हा लोकांना दबावातून व्यक्त होता येत नाही तेव्हा ते पत्रातून व्यक्त होतात अशा शब्दांत प्रतिक्रिया देत आमदार रोहित पवार यांचे वडिल राजेंद्र पवार यांनी या पत्राचं एकप्रकारे समर्थनच केलं आहे. हे निनावी पत्र मला कुणीतरी व्हॉट्सअपवर पाठवलं होतं. मी ते पत्र वाचलं आहे. बऱ्याच वेळा जेव्हा लोकांना असं वाटतं की दडपशाही झाली आहे तेव्हा ते पत्राकडे वळतात.

बच्चू कडूंना ‘शिंदे सरकारची’ स्पेशल ट्रिटमेंट : जिल्हा बँकेचे अध्यक्षपद वाचविण्यासाठी थेट कायद्यातच बदल

अजित पवार 1987 नंतर राजकारणात आले. सतत ते पुढं जायला लागले. त्यावेळी मी पवार साहेबांचा पुतण्या होतो. त्यामुळे कदाचित लोकांना वाटलं असेल की मलाही त्यात इंटरेस्ट आहे. जर मी तसाच राहिलो असतो. कारण मी परदेशातून आल्यानंतर शेती करत होतो. जर मी सतत राजकारणात राहिलो असतो तर मला माहिती नाही की शेती आणि व्यवसायाकडे दुर्लक्ष झालं असतं. पण मी सामाजिक काम करत राहिलो.

त्यामुळे मला असं वाटतं की मी शेती उत्तम करू शकलो. त्यानंतर मी माझं आर्थिक स्थिरीकरण शेतीतून व्यवसायातून आणि व्यवसायानंतर वाढवत बारामती अॅग्रो ज्यावेळी मी पहायला लागलो तेव्हा व्यवसायातून वाढत गेल्याने मला वाटतं उद्योग धंद्याचा जो बेस आहे आणि रोहित पवार 21 व्या वर्षी ज्यावेळी मला मदत करायला आले त्यांना जो बेस मला देता आला ही चांगली गोष्ट झाली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज