डीनला शौचालय साफ करायला लावणं भोवलं : खासदार हेमंत पाटील यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

डीनला शौचालय साफ करायला लावणं भोवलं : खासदार हेमंत पाटील यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

नांदेड : हिंगोलीचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांना शौचालय साफ करायला लावल्याने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी हेमंत पाटील यांच्यावर सोशल मिडीयातून मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. (case has been registered against Shiv Sena MP Hemant Patil of Hingoli under the Atrocities Act)

नांदेडच्या शंकरराव चव्हाण रुग्णालयात सोमवारी 24 तासांत 24 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. यानंतर या घटनेवरुन सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात असताना खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी ग्णालयात घाणीचे साम्राज्य पाहताच पाटील चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी दुरावस्थेवरुन रुग्णालय प्रशासनाला चांगलच धारेवर धरलं. अनेक शौचालय ब्लॉक असल्याचं, आणि काही शौचालयात तर सामानही ठेवल्याचं समोर आलं होतं.

नागपूरमध्ये 24 तासांत 25 मृत्यू! महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमधील मृत्यूचे सत्र सुरुच

शासयकी रुग्णालयाची अशी अवस्था पाहुन हेमंत पाटील यांनी अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांना शौचालय साफ करायला लावले. “आज महात्मा गांधी जयंती आहे, या आपण स्वच्छता अभियान राबवू” असे म्हणत वाकोडे यांना शौचायलामध्ये पाठवून ते साफ करवून घेतले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पाटील यांच्यावर सोशल मिडीयामधून मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यानंतर त्यांच्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली होती. आता या तक्रारीच्या आधारे त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

नांदेडच्या सरकारी रुग्णालयाला मुश्रीफांची भेट, ‘प्रत्येक रुग्णांच्या मृत्यूची चौकशी होणार’

यावेळी बोलताना हेमंत पाटील म्हणाले, या घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार आहे. रुग्णालयात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. यातच औषधाचा देखील तुटवडा आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनातील दोषी अधिकाऱ्यांवर आणि डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र आता त्यांच्यावरच अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube