शिंदेंच्या 4 खासदारांना धक्का! नाराजी अन् बंडखोरीच्या भीतीने उमेदवारीच गेली; आता नंबर कुणाचा?

शिंदेंच्या 4 खासदारांना धक्का! नाराजी अन् बंडखोरीच्या भीतीने उमेदवारीच गेली; आता नंबर कुणाचा?

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या काळात महायुती नाराजी आणि बंडखोरीचा सामना (Lok Sabha Elections 2024) करत आहे. उमेदवारांना दिलेली उमेदवारी रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे तर काही जणांना मतदारसंघातील नाराजी भोवली आहे. यामध्ये चक्क विद्यमान खासदार भरडले गेले आहेत. महायुतीच्या जागावाटपात आतापर्यंत एकनाथ शिंदेंच्या चार (Eknath Shinde) खासदारांचा पत्ता अशा पद्धतीने कट करण्यात आला आहे. आणखीही काही खासदार रडारवर आहेत.

हेमंत पाटालांना नाराजी भोवली 

हिंगोली मतदारसंघात एकनाथ यांनी विद्यमान खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनाच पुन्हा उमेदवारी दिली होती. मात्र त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून मतदरसंघात नाराजी उफाळून आली. स्थानिक आमदार आणि भाजप नेते पाटील यांच्या विरोधात गेले. काहीही करून हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करा अशी मागणी या नेत्यांनी केली. भाजपकडून सुद्धा दबाव वाढला. त्यामुळे बुधवारी अखेर शिंदे गटाने हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द केली. मतदारसंघातील नाराजीचा चांगलाच फटका पाटील यांना बसला. त्यांच्या जागी शिंदे गटाने आता बाबुराव कोहळीकर यांना उमेदवारी दिली आहे.

Eknath Shinde : उद्धव ठाकरेंमध्ये जासूस करमचंद अवतरला; CM शिंदेंचा खोचक टोला

पाच टर्म खासदार भावना गवळींना धक्का 

वाशिम यवतमाळ मतदारसंघाच्या विद्यमान खासदार भावना गवळी सुद्धा आपली उमेदवारी कायम ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत होत्या. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. मागील 25 वर्षांपासून खासदार असलेल्या भावना गवळी यांना यावेळी मात्र लाख प्रयत्न केल्यानंतरही उमेदवारी मिळू शकली नाही. त्यांच्या जागी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली.

या राजकारणानंतर भावना गवळी यांनीही बंडखोरीची भाषा सुरू केली आहे. उमेदवारी नाकारली असली तरी मतदारसंघावरील दावा सोडणार नाही असे गवळी यांनी स्पष्ट केले. इतकेच नाही तर गुरुवारी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गवळी यांच्या या भूमिकेमुळे शिंदे गटाचे टेन्शन नक्कीच वाढणार आहे.

धैर्यशील मानेंची वाढली धाकधूक 

शिवसेनेतील फुटीवेळी एकनाथ शिंदे यांच्या बरोबर जे 13 खासदार गेले होते त्यातीलच खासदार हेमंत पाटील, भावना गवळी यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. हेमंत गोडसे आणि धैर्यशील माने यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार कायम आहे. तर रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांची उमेदवारी आधीच कापण्यात आली आहे. धैर्यशील माने यांच्या जागेवर त्यांच्या आई निवेदिता माने यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. तर वायव्य मुंबईचे खासदार गजानन किर्तीकर यांच्या ऐवजी त्यांच्या मुलाला उमेदवारी मिळाली आहे.

Jalgaon LokSabha : उन्मेश पाटलांऐवजी करण पवारांना संधी; ठाकरेंच्या मनात नक्की काय?

गोविंदांच तिकीट अजून फायनल नाही 

दरम्यान, बॉलीवूड अभिनेता गोविंदानेही मागील आठवड्यात शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला होता. गोविंदाला लोकसभेची उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा त्याच वेळी झाली होती. अद्याप गोविंदाच्या उमेदवारीबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.

हेमंत गोडसेंचं तिकीट धोक्यात 

नाशिकमध्ये महायुतीत मोठा तिढा निर्माण झाला आहे. या मतदारसंघावर मनसेने दावा केला आहे. मनसे अजून तरी महायुतीत सहभागी नाही. तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने नशिकसाठी कमालीचा जोर लावला आहे. छगन भुजबळ यांचे नाव अनपेक्षितपणें पुढे आले. इतकेच नाही तर स्वतः भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की जर नाशिकची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली तर आपण घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवू. या सगळ्या घडामोडींमुळे शिंदे गटाचा नशिकवरील दावा ढिला होत चालला आहे. त्यामुळे हेमंत गोडसे यांची उमेदवारी डेंजर झोनमध्ये आली आहे. ऐनवेळी काय होईल आताच काही सांगता येणार नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज