Jalgaon LokSabha : उन्मेश पाटलांऐवजी करण पवारांना संधी; ठाकरेंच्या मनात नक्की काय?
Jalgaon Loksabha : भाजपचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील (Unmesh Patil) यांनी अखेर उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यांनाच ठाकरे गटाकडून जळगाव लोकसभा (Jalgaon Loksabha) उमेदवारी देणार असल्याची चर्चा होती पण उद्धव ठाकरेंनी करण पवार (Karan Pawar) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे विद्यमान खासदारांना सोडून ठाकरे यांनी करण पवारांनाच का संधी दिली? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
विद्या बालन आणि प्रतीक गांधी यांच्यातील अफलातून केमिस्ट्री; ‘दो और दो प्यार’ मधील गाणे रिलीज
उद्धव ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये जळगावातून उन्मेश पाटलांऐवजी करण पवार तर कल्याणमधून वैशाली दरेकर, पालघरमधून भारती कामडी, हातकणंगलेमधून सत्यजित पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता जळगावामध्ये महायुतीच्या उमेदवार स्मिता पाटील यांची आणि महाविकास आघाडीकडून करण पवार रिंगणात उभे आहेत.
अजय देवगणच्या वाढदिवशी Maidaan चा शेवटचा ट्रेलर रिलीज; कोण आहेत? सय्यद अब्दुल रहीम
करण पवार हे पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष आहेत. जळगावातील अनेक तालुक्यांमध्ये त्यांचा दांडगा संपर्क आहे. यासोबत त्यांचे काका सतिश पाटील यांचा पाठिंबा आणि विशेष म्हणजे उन्मेश पाटील यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. या दोन्ही गोष्टींमुळे जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार स्मिता पाटील यांना तगडं आव्हान करण पवार हे देऊ शकतात. त्यामुळेच उद्धव ठाकरेंकडून पवारांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून यावेळी उन्मेश पाटील यांचे तिकीट कापण्यात आले होते. यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते भारतीय जनता पक्षाला रामराम करून ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. आज त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना (ठाकरे गट) मध्ये प्रवेश केला आहे. यावेळी त्यांनी आपण शिवसेनेमध्ये तिकीटसाठी नाहीतर स्वाभिमानासाठी आलो असल्याचे सांगतिले. बदल्याचं राजकारण फार वेदना देणारा आहे. या कठीण काळात मला उद्धव ठाकरे यांनी आधार दिला असं त्यांनी यावेळी सांगितले.