Eknath Shinde : “उद्धव ठाकरेंमध्ये जासूस करमचंद अवतरला”; CM शिंदेंचा खोचक टोला
Eknath Shinde replies Uddhav Thackeray : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्या (Abhishek Ghosalkar) प्रकरणाचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात उमटत आहेत. उद्धव ठाकरे (Uddahv Thackeray) यांनी काल पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली होती. अभिषेक घोसाळकरवर गोळ्या मॉरिसनेच चालवल्या की आणखी कुणी चालवल्या? त्या दोघांनाही मारण्याची सुपारी आणखी कुणी दिली होती का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अत्यंत खोचक शब्दांत प्रत्यु्त्तर दिले. ‘घडलेली घटना अतिशय वेदनादायी आहे. त्यावरून राजकारण करणेही वाईट आहे. फावल्या वेळेत सीआयडी, क्राईम पेट्रोल बघितल्याने उद्धव ठाकरे यांच्यात जासूस करमचंद अवतरला असावा’, असा खोचक टोला शिंदेंनी लगावला.
पुणे हादरले ! दुकानमालकावर गोळ्या झाडल्या; नंतर सराफ व्यावसायिकाची रिक्षामध्येच आत्महत्या !
शिंदे पुढे म्हणाले, अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. या घटनेवरून होणारे राजकारणही दुर्दैवीच आहे. या घटनेची चौकशी पोलीस करत आहेत. कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही. गृहमंत्री आणि गृहखाते सक्षम आहे. या घटनेवर मी आणि गृहमंत्री दोघेही बारीक लक्ष ठेऊन आहोत. अडीच वर्षात फक्त दोन वेळा मंत्रालयात गेलेले फावल्या वेळेत सीआयडी आणि क्राईम पेट्रोल पाहत असतील. त्यातील जासूस करमचंद त्यांच्यात अवतरला असेल, असा खोचक टोली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
कोणत्याही गुन्हेगाराला पाठिशी घालण्याचं काम आम्ही करणार नाही. सूड भावनेने काम करण्याचा प्रश्नच येत नाही. आधी काय काय घडलंय हे सगळ्यांनाच माहिती आहे. कंगना रनौतचं घर पाडलं. हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना जेलमध्ये टाकलं. केंद्रीय मंत्री नारायण राणेंना तर जेवणाच्या ताटावरून अटक केली.. पालघरमध्ये साधूंचं हत्याकांड घडलं, याही घटना घडल्या आहेत याची आठवण त्यांनी करून दिली.
भाजपचं हिंदुत्व बेगडी, हा सगळा कचरा साफ करणार; उद्धव ठाकरे कडाडले
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ?
अभिषेक घोसाळकरवर गोळ्या मॉरिसनेच चालवल्या की आणखी कुणी चालवल्या? त्या दोघांनाही मारण्याची सुपारी आणखी कुणी दिली होती का?. अभिषेक घोसाळकरांची हत्या झाली नंतर ज्याने हत्या केली त्यानेही आत्महत्या केली. हे प्रकरण वाटते तितके सोपे नाही. त्याने जर हत्या केली तर मग नंतर त्याने स्वतः आत्महत्या का केली, हा प्रश्न राहतोच असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.