‘उत्तर देऊ शकत होतो पण..,’; आंबेडकरांच्या आरोपांवर ठाकरे पहिल्यांदाच बोलले

‘उत्तर देऊ शकत होतो पण..,’; आंबेडकरांच्या आरोपांवर ठाकरे पहिल्यांदाच बोलले

Udhav Thackeray On Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) संजय राऊतांवर केलेल्या आरोपांवर आम्ही उत्तर देऊ शकत होतो पण दिलं नाही, या शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) हे आंबेडकरांनी केलेल्या आरोपांवर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. दरम्यान,जागावाटपाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत आणि वंचितची फिस्कटली. युती फिस्टकल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी संजय राऊत खोटं बोलत असल्याचा आरोप केला होता. त्यावर उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका मांडली आहे.

No Entry 2: बोनी कपूरने अनिल कपूरसोबतच्या वादावर सोडल मौन; म्हणाला, ‘मला धक्का बसला…’

उद्धव ठाकरे म्हणाले, मी प्रकाश आंबेडकराविषयी काही बोलू शकत नाही. युतीसाठी मी प्रयत्न केले होते. आमच्या दोघांचेही आजोबा यांनी सोबत मिळून काम केलं समाजप्रबोधनाचं काम केलं आहे. आज मलाही वाटत होतं की, संविधान वाचवण्यासाठी आम्ही सोबत काम करावं. असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

धक्कादायक! ICU मध्ये उंदीर चावल्याने रूग्ण दगावला; पुण्यातील ससूनमधील घटना

तसेच आपण हुकूमशाहीविरुद्ध एकत्र आलो होतो. आज आपलं जमलं नसेल पण भविष्यात जमणारच नाही अशी भूमिका घेऊ नका. काही वेळा काही गोष्टी होत नाहीत, प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. त्यात तथ्य नव्हतं. आम्ही त्यांना प्रत्युत्तर दिलं असतं. पण आम्ही त्यांच्याविरोधात काही बोललो नाही. बोलणार नाही. त्यांनी माझ्यावर कितीही टीका केली तरी मी त्यांच्याविरोधात बोलणार नाही. त्यांनी त्यांची भूमिका जाहीर केली आहे. ते काहीही बोलले तरी मी त्यांच्याविरोधात बोलणार नसल्याचं ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.

आंबेडकरांनी कृपया करुन त्यांनीही अलोचना करु नये, केली तरीही आम्ही करणार नाही, आज आपलं जमलं नसेल, पण प्रकाशजी, भविष्यात आपलं जमणारच नाही, अशी भूमिका घेऊ नका, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांना केलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube