धक्कादायक! ICU मध्ये उंदीर चावल्याने रूग्ण दगावला; पुण्यातील ससूनमधील घटना

धक्कादायक! ICU मध्ये उंदीर चावल्याने रूग्ण दगावला; पुण्यातील ससूनमधील घटना

Patient dead in ICU : अनेकदा रुग्णालयांमध्ये अपघात झाल्याने रुग्ण आजारांऐवजी या अपघातानेच दगावल्याच्या घटना आपण पाहतो. अशीच एक धक्कादायक घटना पुण्याच्या ससून रुग्णालयात ( Sasoon hospital ) घडली आहे. त्या रुग्णालयामध्ये चक्क आयसीयूमध्ये ( ICU ) उपचार घेत असलेल्या एका तरुण रुग्णाचा उंदीर चावल्यामुळे मृत्यू झाला आहे.

‘उन्मेश पाटलांचं माहित नाही पण ‘हा’ नेता कमबॅक करणार’; अंधारेंचा दावा

त्या प्रकारानंतर नातेवाईकांनी चांगला संताप व्यक्त केला. सागर रेणुसे असे या मृत्यू पावलेल्या तीस वर्षे तरुणाचं नाव आहे. त्यामुळे ससून रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सागर या तरुणाच्या पुण्यातील भोर तालुक्यात अपघात झाला होता. त्यानंतर त्याला 16 मार्चला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये भाजपचाच उमेदवार! नारायण राणे यांनी ठोकला दावा, शिवसेनेची कोंडी

यावेळी त्याला रुग्णालयातील आयसीयू कक्षामध्ये ठेवण्यात आलं होतं. मात्र 26 मार्चला त्याची प्रकृती खालावत चालली होती. यावेळी त्याला नेमकं काय झालं? याचा शोध घेतला असता त्याला उंदीर चावल्याचा समोर आलं. आयसीयूमध्ये त्याच्या डोक्याला, कानाला आणि इतर अवयवांना उंदराने चावा घेतला होता. त्यामुळे त्याची प्रकृतीत खालावली आणि आज अखेर त्याचं निधन झालं.

दरम्यान या प्रकरणी सागर तरुणाचा उंदराने चावा घेतल्याने मृत्यू झाल्याचं सुरुवातीला रुग्णालय प्रशासनाने नाकारलं. मात्र त्यानंतर डॉक्टरांनी हे मान्य केलं. तसेच या घटनेवर रूग्णाच्या नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. हा तरूण अपघातात वाचला मात्र अखेर उंदराच्या चाव्याने त्याला प्राण गमवावे लागले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube