भारतीय क्रिकेटपटूची विमानातच प्रकृती बिघडली; थेट ICU त भरती, कारण तरी काय ?

  • Written By: Published:
भारतीय क्रिकेटपटूची विमानातच प्रकृती बिघडली; थेट ICU त भरती, कारण तरी काय ?

MayanK Agarwal Hospitalized: भारतीय क्रिकेटपटू आणि रणजी ट्रॉफीसाठी (Ranji Trophy) कर्नाटक संघचा कर्णधार असलेल्या मयंक अग्रवालची (Mayank Agarwal) प्रकृती विमानातच बिघडली आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याला विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

तो सूरतवरून अगरतला येथे विमानाने जात होता. प्रवास करत असताना त्याच्या सीटसमोर ठेवलेले पाणी तो पिला. त्यानंतर त्याच्या तोंडाला आणि गळ्याला जळजळ सुरू झाली. त्याला बोलता येत नव्हते. त्यानंतर लगेच त्याला अगरतला येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. कर्नाटकचा कर्णधार मयंक अग्रवालने रणजी स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे. त्याने गुजरातविरुद्ध 109 धावांची जबरदस्त खेळी केली आहे. त्यानंतर गोवाविरुद्ध मयंकने 114 धावांची खेळी केली आहे. तर त्रिपुराविरुद्ध त्याने अर्धशतकही झळकाविले आहे.
मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; सर्वेक्षण करण्यास आणखी दोन दिवसाची मुदतवाढ

कसोटी खेळाडू असलेला मयंक अग्रवाल हा गेल्या दोन वर्षांपासून संघाबाहेर आहे. तो भारतासाठी शेवटचा सामना 2022 मध्ये खेळला होता. त्यानंतर त्याला टीम इंडियात जागा मिळाली नाही.

‘मंत्रिमंडळाला विश्वासात न घेताच मराठा आरक्षणाचा अध्यादेश’; भुजबळांनंतर वडेट्टीवारांनीही ठेवलं बोट

मयंकची कारकीर्द

मयंक अग्रवाल हा भारतासाठी 21 कसोटी आणि पाच एकदिवसीय सामने खेळला आहे. कसोटीतील 36 डावांत त्याने 1 हजार 488 धावा कुटल्या आहेत. त्यात चार शतके आणि सहा अर्धशतके आहे. तर त्याच्या नावावर सर्वाधिक 243 धावा आहेत. पाच एकदिवसीय सामन्यात केवळ 86 धावा आहेत. मयंकने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube