… तर पुन्हा करता येणार नाही फलंदाजी, बीसीसीआयने बदलले क्रिकेटचे 4 नियम
New Cricket Rules : बीसीसीआयने मोठा निर्णय घेत देशांतर्गत क्रिकेटच्या पुढील हंगामासाठी अनेक नियमांमध्ये बदल केले आहे. रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy) पहिल्या फेरीला आजपासून (11 ऑक्टोबर) सुरुवात झाली आहे. प्रेस रिलीज करून बीसीसीआयने (BCCI) नवीन नियमांबद्दल माहिती दिली आहे. बीसीसीआय फलंदाजी, गोलंदाजी आणि गुण वितरणापर्यंतच्या नियमांमध्ये बदल केला आहे. नवीन नियमांनुसार जर एखादा फलंदाज दुखापतीशिवाय इतर कारणांमुळे फलंदाजी करू शकला नाही तर त्याला त्या डावात पुन्हा फलंदाजी करता येणार नाही. याच बरोबर जर गोलंदाजी करताना जर गोलंदाजाने किंवा इतर खेळाडूने चेंडूवर लाळ टाकली तर चेंडू ताबडतोब बदलावा लागेल आणि दंडही आकारला जाईल.
बीसीसीआयने हे 4 नियम बदलले
दुखापतीशिवाय इतर कारणांमुळे फलंदाजला फलंदाजी करता आली नाही तर तो फलंदाज आऊट मानला जाईल तसेच जर विरोधी संघाच्या कर्णधाराने पुन्हा फलंदाजीसाठी परवानगी दिली तरीही त्याला पुन्हा फलंदाजीची संधी मिळणार नाही.
गोलंदाजी करणाऱ्या संघाने चेंडूवर लाळ टाकली असेल, तर चेंडू ताबडतोब बदलावा लागेल आणि दंडही आकारला जाईल.
जर फलंदाज एक धाव घेतल्यानंतर थांबला आणि ओव्हरथ्रो केल्यानंतर, पुन्हा एकमेकांना ओलांडण्यापूर्वी चेंडूने सीमा गाठली तर केवळ चौकार म्हणजेच 4 धावा स्कोअरमध्ये जोडल्या जातील. आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 दरम्यान झालेल्या करारानुसार हा नियम बदलण्यात आला असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.
तर दुसरीकडे सीके नायडू स्पर्धेत गुण वितरणाबाबतच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यासाठी दोन परिस्थिती नमूद केल्या आहेत.
परिस्थिती 1: प्रथम फलंदाजी करणारा संघ ‘अ’ पहिल्या डावात 98 षटकांत 398 धावांत सर्वबाद झाला, तर त्याला 4 फलंदाजी गुण मिळतील. ‘अ’ संघाला क्षेत्ररक्षण करताना 5 पेनल्टी धावा दिल्या गेल्या, तर त्याची धावसंख्या आता 98 षटकांत 403 धावा होईल आणि त्याला 5 फलंदाजी गुण मिळतील.
परिस्थिती 2: प्रथम फलंदाजी करणारा संघ पहिल्या डावात 100.1 षटकात 398 धावांवर सर्वबाद झाला, तर त्याला 4 फलंदाजी गुण मिळतील. क्षेत्ररक्षण करताना, ‘अ’ संघाला 5 पेनल्टी धावा मिळाल्या, तर त्याची धावसंख्या 100.1 षटकात 403 धावा होईल परंतु संघाला 5 फलंदाजी गुण मिळणार नाही.
काकांनंतर अजित पवारही ॲक्शन मोडमध्ये, काँग्रेसला देणार धक्का, 3 आमदारांचे इनकमिंग?
नियम कुठे लागू होतील?
बदललेले नियम बीसीसीआयच्या सर्व देशांतर्गत सामन्यांना लागू होतील. रणजी ट्रॉफी व्यतिरिक्त, हे नियम सर्व बहु-दिवसीय सामने आणि मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये देखील लागू केले जातील. अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.