काकांनंतर अजित पवारही ॲक्शन मोडमध्ये, काँग्रेसला देणार धक्का, 3 आमदारांचे इनकमिंग?
Ajit Pawar : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाताना दिसत आहे. काही दिवसापूर्वी भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटाचे अनेक नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षात गेले आहे. तर येत्या काही दिवसात आणखी काही नेते अजित पवार गटातून शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.
तर दुसरीकडे अजित पवार देखील महाविकास आघाडीला (MVA) मोठा धक्का देण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार अजित पवार गटात आज (11 ऑक्टोबर) रात्री काँग्रेसचे (Congress) तीन आमदार प्रवेश करणार आहे. माहितीनुसार, काँग्रेसचे शामसुंदर शिंदे (Shamsundar Shinde) , हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) आणि झीशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज रात्री प्रवेश करणार आहे.
विधानसभा परिषद निवडणुकीमध्ये या तिन्ही आमदारांवर क्रॉस वोटिंग करण्याचा आरोप होता त्यामुळे काँग्रेस पक्ष या तिन्ही आमदारांवर कारवाई करणार अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली होती. तर आता आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी तिन्ही आमदार अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची समोर आली आहे. मात्र याबाबत आतापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार काय म्हणणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
तर दुसरीकडे अजित पवार गटातील नेते रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) 14 ऑक्टोबर रोजी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहे. रामराजे निंबाळकर यांच्यापूर्वी भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) आणि कागलमधील नेते समरजीत घाटगे (Samarjit Ghatge) यांनी देखील शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे.
पाकिस्तानला धक्का, इंग्लंडकडून पराभव अन् WTC पॉइंट टेबलमध्ये मोठा फेरबदल
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारकडून उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली आहे. तर येत्या काही दिवसात अजित पवार आणि भाजपमधील आणखी काही नेते शरद पवार तसेच काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.