पाकिस्तानला धक्का, इंग्लंडकडून पराभव अन् WTC पॉइंट टेबलमध्ये मोठा फेरबदल
WTC 2025 Points Table : पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये (England Vs Pakistan) सुरु असल्याने तीन कसोटी सामन्यांची मालिकेच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने शानदार कामगिरी करत पाकिस्तानचा एक डाव आणि 47 धावांनी पराभव केला आहे. या पराभवानंतर पाकिस्तानला डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये (WTC 2025 Points Table) मोठा धक्का बसला आहे.
अपडेटेड डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये पाकिस्तानचा संघ 9व्या स्थानावर घसरला आहे. पाकिस्तानचा गेल्या आठ सामन्यात हा सहावा पराभव होता. डब्ल्यूटीसी 2025 मध्ये पाकिस्तानकडे फक्त 16.67 टक्के पॉइंट आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संघ आता जवळ जवळ या स्पर्धेतून बाहेर झाला आहे.
तर दुसरीकडे या विजयानंतर इंग्लंडच्या खात्यात 45.59 टक्के पॉइंट झाले आहे. त्यामुळे या स्पर्धेत इंग्लंडचा संघ चौथ्या क्रमांकावर कायम आहे तर इंग्लडच्यावर श्रीलंका आहे ज्यांच्या खात्यात 55.56 टक्के गुण आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर गतविजेता ऑस्ट्रेलिया आहे आणि या स्पर्धेत टॉपवर भारतीय संघ आहे. भारतीय संघाचे आतापर्यंत या स्पर्धेत 74.24 टक्के पॉइंट आहे तर ऑस्ट्रेलियाचे 62.50 टक्के पॉइंट आहे.
पाकिस्तानला धक्का
पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 556 धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून अब्दुल्ला शफीक, शान मसूद आणि आगा सलमानने शानदार शतक झळकावले.
कोपरगावला तीन हजार कोटींचा निधी… आशुतोष काळेंनी आकडेवारी डिटेलमध्ये सांगितली..
तर प्रत्युत्तरात इंग्लंडने हॅरी ब्रूकचे त्रिशतक आणि जो रूटच्या द्विशतकाच्या जोरावर 823 धावांवर पहिला डाव घोषित केला. यानंतर इंग्लंडने शानदार गोलंदाजी करत पाकिस्तानचा दुसरा डाव 220 धावांवर रोखला आणि पहिला सामना एक डाव आणि 47 धावांच्या फरकाने जिंकला.