मी कुठं जातोय याला किंमत नाही; अजित पवारांकडं तक्रार करणार, रामराजे निंबाळकर भाजपवर का संतापले?

आम्हाला न्याय मिळत नसेल आणि कार्यकर्ता घरी बसणार असेल, कार्यकर्त्यांना फोडण्याचा प्रयत्न होणार असेल तर आम्ही उत्तर काय द्यायची?

मी कुठं जातोय याला किंमत नाही; अजित पवारांकडं तक्रार करणार,रामराजे निंबाळकर भाजपवर का संतापले?

Ramraje Naik Nimbalkar : अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर हे तुतारी हाती घेणार अशी चर्चा होती. मात्र, रामराजे निंबाळकर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र, फलटणमध्ये आज (दि.10 आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांबाबतच्या तक्रारींचा पाढाच वाचलाय. तसंच, महायुतीकडे तक्रार करणार असल्याचंही निंबाळकर म्हणाले आहेत.

जागा लढायला मिळेल

मी कुठं जातोय याला किंमत राहिली नाही. आम्हाला न्याय मिळत नसेल आणि कार्यकर्ता घरी बसणार असेल, कार्यकर्त्यांना फोडण्याचा प्रयत्न होणार असेल तर आम्ही उत्तर काय द्यायची? कुठल्याही पक्षात गेलो तरी काय उपयोग होणार आहे. सातारा जिल्हा बँकेच्या कार्यक्रमाला अमित शहा येतो असं म्हणाले होते. कुठून मान आणि दहिवडीमधून फोन गेले राज्य आणि देश पातळीवरील नेतृत्व त्यांना साथ देणार असेल तर आम्ही करायचं काय? असा प्रश्न आम्ही अजित पवारांना विचारणार आहे. तुम्ही अजितदादांना सोडून जाणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. आपल्या विरोधकांनी केलं आहे का? हे पाहावे लागेल. कारण त्यांना असले करण्याची घाण सवय आहे. कारण रामराजे गेले तर भाजपच्या चिन्हावर त्यांना ही जागा लढायला मिळेल असा उद्देश असेल असा थेट घणाघात रामराजे यांनी यावेळी बोलताना केला आहे.

अजित पवारांचा एक फोन अन् उमेदवाराच्या नावाची घोषणा; रामराजे नाईक निंबाळकरांना हसू अवरेना

विरोधी पक्षाकडून जो त्रास झाला म्हणून महाराज साहेबांनी एका वर्षापूर्वी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला पण ज्या उद्देशाने पक्षात आपण गेलो होतो तो उद्देश साध्य झाला नाही. त्यामुळे देशामध्ये अनेक लोक आहेत. परंतु देशामधील इतर लोक सोडून इथे इडी येत असेल तरी ईडीचे काम संपले. युतीत जाताना ज्या गोष्टींवर निर्णय झाला होता. ज्या गोष्टी ठरले होते तसं काही झालं नाही. जो आमदार असेल त्याच्या सांगण्यावरूनच बदल्या होणार असं सांगितलं होतं. परंतु, कोणत्याही बदल्या आमच्या पत्रावर झाल्या नाहीत. फलटणचं पाणी फलटणमध्येच रहायला पाहिजे. माजी खासदार ते पाणी सांगोल्याला नेण्याचा प्रयत्न करतात ते काम आपण हाणून पाडू असंही ते म्हणाले आहेत.

दोन अडीच वर्षात जो त्रास

कार्यकर्ते बोलतात त्याच्या मागे काहीतरी भावना आहेत. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार करायला जमणार नाही हे सांगितलं. मागच्या दोन अडीच वर्षात जो त्रास झालाय त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना अशा आहेत. रामराजे यांना विनंती करतो कार्यकर्त्यांच्या भावना जाणून आपल्याला विचार लागेल. विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भावना मेळाव्यातून एक ते दोन दिवसात जाणून घ्याव्या लागतील. लाडकी बहिण योजना किती दिवस चालेल मला माहित नाही अशी शंकाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

follow us