Ranji Trophy Final : विदर्भावर मात करत मुंबईने 42 व्यांदा जिंकला रणजी ट्रॉफीचा किताब

Ranji Trophy Final : विदर्भावर मात करत मुंबईने 42 व्यांदा जिंकला रणजी ट्रॉफीचा किताब

Mumbai Beat Vidarbha in Ranji Trophy Final and Clinch its 42nd Title : रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघाने (Ranji Trophy) दमदार कामगिरी करत विदर्भ संघावर मात केली. या सामन्यात मुंबई संघाने विदर्भ संघाचा 169 धावांनी पराभव करत रणजी चषकावर नाव कोरलं. या सामन्यात मुंबईने विदर्भासमोर 538 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना विदर्भ संघाला फक्त 368 धावाच करता आल्या. कर्णधार अजिंक्य राहाणेच्या नेतृत्वात मुंबईने हे विजेतेपद पटकावले. मुंबईचा वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीच्या कारकिर्दितील हा अखेरचा सामना होता. त्याने आधीच निवृत्ती जाहीर केली होती. त्याने या शेवटच्या सामन्यात धारदार गोलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

Ranji Trophy Final : व्वा रे पठ्ठा ! मुशीर खानने सचिनचा 29 वर्षांचा विक्रम त्याच्यासमोर मोडला !

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईचे वर्चस्व राहिले. या सामन्यात मुंबईने 538 धावांचे टार्गेट दिले होते. या आव्हानचा पाठलाग करताना विदर्भाच्या फलंदाजांनी संघर्ष केली. पण ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. या आव्हानाचा पाठलाग करताना विदर्भाची सुरुवात चांगली झाली नाही. त्यानंतर कर्णधार अक्षय वाडकरने शतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. त्याला हर्ष दुबेने 65 धावा करत चांगली साथ दिली. एक वेळ अशी आली होती की संघाच्या 333 धावा झाल्या होत्या.

यानंतर मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली. या गोलंदाजीसमोर विदर्भाचे फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत. तुषार देशपांडे, धवल कुलकर्णी, तनुश कोटियनने विकेट घेत विदर्भाचा डाव 368 धावांत गुंडाळला. तनुश कोटियने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या तर तुषार देशपांडे आणि मुशीर खानने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

Ranji Trophy 2024 : शार्दुल ठाकूरची अष्टपैलू कामगिरी, मुंबईची फायनलमध्ये धडक

दरम्यान, या विजयासह मुंबईने 42 व्यांदा हा किताब आपल्या नावे केला. 2015-16 नंतर मुंबईने हा पहिला विजय मिळवला आहे. विदर्भाच्या करुण नायर आणि कर्णधार अक्षय वाडकरने जबरदस्त फलंदाजी केली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी केली करुण नायरने 74 तर अक्षय वाडकरने 102 धावा केल्या. परंतु,  त्यांची झुंज अपयशी ठरली. मुंबईने विदर्भावर मात करत विजेतेपद पटकावले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube