मोठी बातमी! देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ टूर्नामेंटने होणार सुरुवात

BCCI Announced Domestic Cricket Schedule : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने देशांतर्गत (BCCI Domestic Cricket Schedule) क्रिकेट शेड्यूल 2025-26 नुकतेच जाहीर केले आहे. यात काही नवीन बदल करण्यात आले आहेत. स्पर्धेचे स्वरुपही बदलले आहे. शनिवारी झालेल्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यात रणजी ट्रॉफी 2025-26 हंगामाचाही समावेश आहे. रणजी ट्रॉफीत विद्यमान दोन संघांऐवजी एलीट ग्रुपमध्ये फक्त एक टीमला रेलीगेट केले जाईल. याच पद्धतीने प्लेट ग्रुपमध्ये फक्त एकाच टीमला प्रमोट केले जाईल. ही स्पर्धा दोन टप्प्यात होईल. पहिला टप्पा 15 ते 19 नोव्हेंबर तर दुसरा टप्पा 22 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 दरम्यान होईल.
बीसीसीआयची घोषणा नेमकी काय
या वेळापत्रकाची सुरुवात दिलीप ट्रॉफीने होणार आहे. येत्या 28 ऑगस्टपासून दिलीप ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. दिलीप ट्रॉफी आणि वरिष्ठ महिला चॅलेंजर्स ट्रॉफीतील टीम राष्ट्रीय निवडकर्त्यांकडून निश्चित केल्या जातील. मागील सीझनपर्यंत नॉकआउट राउंडमध्ये टीम क्वार्टर फायनल, सेमी फायनल आणि फायनल मॅच खेळत होती. पंरतु, आता या सत्रात आघाडीच्या संघांना सुपर लीगमध्ये तीन अतिरिक्त सामने खेळावे लागणार आहेत.
विदर्भाने 7 वर्षांनंतर जिंकली रणजी ट्रॉफी, अंतिम सामन्यात केरळचा पराभव
ग्रुप ए आणि बी मधील आघाडीचे संघ आपसात भिडताना दिसतील. मागील सत्रातील सर्वात शेवटचा संघ प्लेट ग्रुपमध्ये असेल. या व्यतिरिक्त सैयद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीतही मोठे बदल दिसणार आहेत. सैयद मुश्ताक अली ट्रॉफी आणि सिनियर महिला टी20 ट्रॉफी टूर्नामेंट चार एलीट ग्रुप आणि एक प्लेट ग्रुप फॉर्मेटनुसार खेळतील. अंडर 16, अंडर 19 आणि अंडर 23 कॅटेगरीतील काही ज्यूनियर आणि महिला इव्हेंट्स 5 एलिट प्लस एक प्लेट ग्रुप सिस्टीम अंतर्गत आयोजित केले जातील.
🚨 NEWS 🚨
BCCI convened its 28th Apex Council Meeting on Saturday and made the following key decisions 👇
🔹 A committee to be constituted to formulate comprehensive guidelines aimed at preventing occurrences similar to the victory celebrations in Bengaluru. The committee will… pic.twitter.com/FXEqMO5gU4
— BCCI (@BCCI) June 14, 2025
असे असेल शेड्यूल..
दिलीप ट्रॉफी टूर्नामेंट 28 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर दरम्यान आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेतील फायनल सेट बंगळुरूच्या सेंटर ऑफ एक्सीलेंस येथे होईल. इराणी कप 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान नागपुरात होणार आहे. सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीची सुरुवात 26 नोव्हेंबरपासून होईल. या टूर्नामेंटमधील लीग मॅच 8 डिसेंबरला लखनऊ, हैदराबाद, अहमदाबाद आणि कोलकात्यात होतील. तर नॉकआऊट स्टेज इंदूरमध्ये 12 ते 18 डिसेंबर दरम्यान होतील. विजय हजारे ट्रॉफी लीग 27 डिसेंबपर ते 8 जानेवारी 2026 दरम्यान होईल. या स्पर्धेतील सामने राजकोट, अहमदाबाद, जयपूर आणि बंगळुरूत होतील. तर नॉकआउट स्टेज 12 ते 18 जानेवारी दरम्यान होईल.