औंध-बोपोडी परिसरात पाच ठिकाणी नगरसेवक सनी निम्हण यांच्या पुढाकारातून सार्वजनिक वसुबारस पूजन उत्साहात संपन्न

परंपरा जपण्याच्या उद्देशाने औंध-बोपोडी परिसरात पाच ठिकाणी सार्वजनिक वसुबारस पूजनाचे आयोजन करण्यात आले होते.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 11 06T120652.324

Public Vasubaras worship held with great enthusiasm : दिवाळीच्या मंगलमय पर्वाची सुरुवात वसुबारस या सणाने होते. भारतीय संस्कृतीत गोमातेला अनन्यसाधारण महत्त्व असून, वसुबारसच्या दिवशी गायीचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे. ही परंपरा जपण्याच्या उद्देशाने औंध-बोपोडी परिसरात पाच ठिकाणी सार्वजनिक वसुबारस पूजनाचे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

परिवार चौक, चंद्रकांत गायकवाड चौक (मेडिपॉईंट हॉस्पिटलजवळ), भाले चौक (नागरस रोड), अमित मुरकुटे संपर्क कार्यालय (बोपोडी) आणि पुणे आयटी पार्क (भाऊ पाटील रोड, बोपोडी) या पाच ठिकाणी नागरिकांनी एकत्र येत गोमातेचे पूजन केले.

TCS धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणाला राजकीय वळण, एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्याविरोधातही गुन्हा दाखल

गेली अनेक वर्षे या उपक्रमाच्या माध्यमातून औंध-बोपोडी परिसरातील नागरिकांना एकत्र येऊन वसुबारस साजरी करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. सण-उत्सवांच्या माध्यमातून सामाजिक एकोपा वाढावा, नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची आणि परंपरांची ओळख व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

“आपले सण आणि परंपरा ही आपल्या संस्कृतीची खरी ओळख आहे. वसुबारसच्या निमित्ताने नागरिकांनी कुटुंबीयांसह सहभागी होऊन गोमातेचे पूजन केले. अशा उपक्रमांमुळे सामाजिक एकोपा वाढण्यासोबतच आपल्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन होण्यास मदत होते,” असे मत आयोजक तथा नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी व्यक्त केले.

आपली परंपरा, आपला सण, आपला उत्सव! या भावनेतून औंध-बोपोडी परिसरातील नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

follow us