IPL 2023 MI Vs SRH : हैदराबादचे मुंबईसमोर 201 धावांचे लक्ष्य, मयंक-विव्रतचे अर्धशतक
IPL 2023 MI Vs SRH : च्या 69 व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होत आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. मुंबईसाठी हा सामना अंतिम चारमध्ये जागा करण्यासाठी महत्वाचा. जर मुंबईने हा सामना गमावला तर स्पर्धेतून बाहेर जाईल. त्याचवेळी, जिंकल्यानंतरही संघाचे प्लेऑफमधील स्थान निश्चित होणार नाही. त्याला अजूनही आरसीबी विरुद्ध गुजरात सामन्यात टिकून राहावे लागेल. त्याचवेळी हैदराबादचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तरी त्यांना सन्मानाने स्पर्धेतून बाहेर पडावेसे वाटेल. नाणेफेक जिंकून मुंबईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 200 धावा केल्या आहेत.
सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना पाच गड्यांच्या मोबदल्यात 200 धावा केल्या. हैदराबादकडून मयंक अग्रवालने सर्वाधिक 83 धावा केल्या. तसेच विव्रत शर्माने 69 धावांची खेळी केली. मुंबईकडून आकाश मधवालने चार आणि ख्रिस जॉर्डनने एक विकेट घेतली.
2 हजारांची नोट काळापैसा साठवण्यासाठीच छापली होती! नोटबंदीवर पृथ्वीराज चव्हाणांचा मोदी सरकारवर निशाणा
विव्रत शर्मा बाद झाल्यानंतर सनरायझर्सने ठराविक अंतराने विकेट गमावल्या, त्यामुळे त्यांना पाच विकेट्सवर 200 धावांपर्यंतच मजल मारता आली. मुंबईतकडून आकाश मधवाने शानदार गोलंदाजी करताना चार विकेट घेतल्या. तसेच ख्रिस जॉर्डनला ही एक विकेट मिळाली. आकाश मधवालने एका षटकात दोन बळी घेत हैदराबाद संघाला बॅकफूटवर आणले आहे. क्लासेननंतर त्याने हॅरी ब्रूकलाही क्लीन बोल्ड केले.