रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये भाजपचाच उमेदवार! नारायण राणे यांनी ठोकला दावा, शिवसेनेची कोंडी

रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये भाजपचाच उमेदवार! नारायण राणे यांनी ठोकला दावा, शिवसेनेची कोंडी

Narayan Rane: लोकसभा निवडणुका (Loksabha Election 2024)जाहीर झाल्यापासून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha )महायुतीमध्ये भाजप-शिवसेना शिंदे गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. शिवसेना शिंदे गटाकडून (Shiv Sena Shinde group)या मतदारसंघासाठी ताकद लावली आहे. असं असलं तरी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी महायुतीकडून भाजपच्याच तिकिटावर उमेदवार निवडणूक लढणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे Narayan Raneयांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्यासह कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही जोरदार निशाणा साधला.

अशोक चव्हाणांचा काँग्रेसला संपवण्याचा प्लॅन होता; नाना पटोलेंचा मोठा आरोप

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरुन मंत्री नारायण राणे यांनी सांगितले की, उद्यापर्यंत या ठिकाणचा उमेदवार जाहीर होईल. ज्याला उमेदवारी जाहीर होईल तो कामाला लागेल, असेही यावेळी नारायण राणे यांनी सांगितले.

Sujay Vikhe : जिल्ह्याबाहेरील व्यक्तीवर काय बोलायचं? सुजय विखेंचा जयंत पाटलांवर हल्लाबोल

तसं पाहिलं तर कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र महायुतीमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या लोकसभा जागेवरुन अद्यापही रस्सीखेच सुरुच आहे. या जागेसाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे इच्छुक आहेत. त्याचबरोबर भाजपचे अनेक जण या रेसमध्ये असल्याचेही पाहायला मिळत आहे. पण उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे उद्या पाहायला मिळणार आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना शिंदे गट आग्रही आहे. शिंदे गट ही जागा आपल्याला मिळावी यासाठी आस लावून मुंबईत ठाण मांडून बसलेला आहे. या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाकडून खासदार विनायक राऊत यांना संधी देण्यात आली आहे.

त्यामुळे राऊत यांना कडवी झूंज देईल असा उमेदवार सध्यातरी शिवसेना शिंदे गटाकडे नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे भाजपकडून या जागेवर दावा केला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून या भागामध्ये प्रचाराला सुरुवात झाली आहे. मात्र महायुतीकडून अद्याप उमेदवारच निश्चित झालेला नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज