Eknath Shinde : मोदी जे ठरवतात ते करतातच! शिंदेंनी पवारांसमोरच केलं मोदींचं कौतुक
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एखादं काम करायचं ठरवलं की ते कामे पूर्ण करतातच. मग ते जम्मू काश्मिरातील कलम 370 असो, राम मंदिराचं बांधकाम असो किंवा देशातील गरीबांच्या कल्याणाचा मुद्दा असो. आज भारताने ब्रिटिशांच्या देशाच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकलं हा आपल्यासाठी अभिमानाचा क्षण आहे, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले.
PM Modi In Pune Live : पुणे देशातल्या अर्थव्यवस्थेला चालना देणारे महत्त्वाचे शहर : मोदी
हा पुरस्कार याआधी अनेकांना दिला गेला आहे. पवार साहेबांनाही संस्थेने हा पुरस्कार दिला आहे. लोकमान्य टिळकांचे अनेक क्षेत्रात प्राविण्य होते. ते त्यांच्या कर्तुत्वाने लोकमान्य झाले होते. मोदीजींनी देखील गेल्या नऊ वर्षात देशासाठी केलेल्या कामांना लोकमान्यता मिळालेली आहे, असे शिंदे म्हणाले. टिळकांनी स्वराज्यासाठी लढा दिला. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वराज्याचे सुराज्यात रुपांतर करण्यासाठी आपल्याला किती यश मिळालं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मोदींनी देशाच्या कारभाराची सूत्रे हाती घेतल्यानंतर हेच धोरण ठेवत सबका साथ सबका विकासाचा नारा देत सुराज्यासाठी प्रयत्न केले.
लोकमान्य टिळक प्रखर देशभक्त होते. ब्रिटिशांनाही थरकाप उडवणारं लोकमान्यांचं नेतृत्व होते. त्यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाल्याने मी त्यांचं अभिनंदन करतो. ज्यांनी देशासाठी मोठं काम केलं, त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. मोदीजी हे जागतिक पातळीवरील नेते ठरले आहेत. लोकमान्य टिळक जागतिक किर्तीचे महापुरुष होते. त्यांनी स्वराज्यासाठी लढा दिला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वराज्याचे सुराज्यात रुपांतर करण्यासाठीही त्यांनी मोठं योगदान दिलं. मोदींनी देशाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सबका साथ सबका विश्वास नारा दिला. म्हणूनच मोदींच्या कार्याची पोचपावती या सन्मानाने होतोय याचा मला अभिमान आहे.
Eknath Shinde : मोदी जे ठरवतात ते करतातच! शिंदेंनी पवारांसमोरच केलं मोदींचं कौतुक