PM Modi In Pune Live : पुणे देशातल्या अर्थव्यवस्थेला चालना देणारे महत्त्वाचे शहर : मोदी

  • Written By: Published:
PM Modi In Pune Live : पुणे देशातल्या अर्थव्यवस्थेला चालना देणारे महत्त्वाचे शहर : मोदी

PM Modi In Pune Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे शहराच्या दौऱ्यावर असून, काहीवेळापूर्वी मोदींचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर आता मोदींच्या हस्ते दोन मेट्रो मार्गाचं लोकार्पण होणार आहे. याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या घरांचे हस्तांतरण आणि पायाभरणी आदींसह विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. त्याआधी पुण्यात दाखल झाल्यानंतर मोदींच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात पुजा आणि अभिषेक करण्यात आला. एस. पी महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या बंडानंतर अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर येण्याची ही पहिलीच वेळ होती. मोदींच्या आजच्या पुणे दौऱ्याचा मिनिट टू मिनिट अपडेट देणारा लाईव्ह ब्लॉग.

LIVE NEWS & UPDATES

  • 01 Aug 2023 03:02 PM (IST)

    पुण्यातून बंगळुरूच्या कोंडीवरून हल्लाबोल

    मोदी म्हणाले की, एका बाजूला आपण पुण्यात होत असलेला विकास पाहू शकतो आणि दुसऱ्या बाजूला आपण बंगळुरूमध्ये काय घडत आहे तेही पाहू शकतो. बंगळुरू हे एक प्रमुख आयटी हब आहे, तिथे वेगाने विकास व्हायला हवा होता, पण कर्नाटक सरकार स्वतः मान्य करते की त्यांच्याकडे बंगळुरू किंवा कर्नाटकच्या विकासासाठी पैसा नाही. राजस्थानचीही तीच परिस्थिती आहे, तिथे कर्जे वाढत असून विकास कामे होत नसल्याचे सांगत मोदींनी विरोधकांचे कान टोचत हल्लाबोल केला.

  • 01 Aug 2023 02:35 PM (IST)

    महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासामुळे देशाला चालना

    स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासामुळे भारताच्या औद्योगिक विकासाला सातत्याने चालना मिळाली आहे. भारतातील शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांचे राहणीमान सुधरायचे असेल, तर सार्वजनिक वाहतुकीचे आधुनिकीकरण करणे गरजेचे असल्याचे यावेळी मोदींनी सांगितले. 2014 पर्यंत 250 किमीपेक्षाही कमी मेट्रो नेटवर्क होतं.  पण आता देशात हे नेटवर्क 800 किमीहूनही जास्त झालं आहे.

    2014 मध्ये फक्त 5 शहरात मेट्रोची सेवा होती. पण आज देशात 20 शहरांमध्ये मेट्रोचे जाळे पसरले असून, महाराष्ट्रात पुण्याशिवाय मुंबई आणि नागपूरमध्येदेखील मेट्रोचा विस्तार होत आहे. पुण्यात प्रदुषण कमी करण्यासाठी मेट्रोचा विस्तार गरजेचा असल्याचेही यावेळी मोदींनी अधोरेखित केले. पुणे सारख्या शहरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवनाचा दर्जा अधिक चांगला व्हावा यासाठी आमचे सरकार सतत काम करत आहे. महाराष्ट्राचा विकास झाला तर भारताचा विकास होईल. भारताचा विकास झाला तर महाराष्ट्राचा विकास होईल

  • 01 Aug 2023 02:30 PM (IST)

    भारताच्या विकासाचा फायदा पुण्यालाही - मोदी

    आज जग भारताच्या विकासाची चर्चा करत आहेत याचा फायदा पुण्यालादेखील होत आहे. पुण्यासारख्या शहरात क्वालिटी ऑफ लाइफ सुधारण्यासाठी भाजप सरकार सातत्याने काम करत आहे. पुणे मेट्रोचं काम जेव्हा सुरू झालं तेव्हा मला त्याचं भूमिपूजन करण्याची संधी मिळाली होती. या पाच वर्षात येथे तब्बल 24 किलोमीटर मेट्रो नेटवर्क सुरू झाल्याते यावेळी मोदींनी सांगितले. कोथरूड डेपोला याआधी कचरा डेपो होता आज तिथे मेट्रोचा डेपो उभरला आहे.

  • 01 Aug 2023 02:20 PM (IST)

    ऑगस्ट महिना क्रांतिचा - मोदी

    ऑगस्ट महिना हा उत्सव आणि क्रांतिचा महिना आहे. क्रांतिच्या या महिन्यात सुरुवातीलाच पुणे येथे येण्याचे सौभाग्य मिळाले. भारताच्या स्वातंत्र्यात पुण्याचा मोठे योगदान राहिले आहे. एवढेच नव्हे तर पुणे देशातल्या अर्थव्यवस्थेला चालना देणारे महत्त्वाचे शहर असल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले.

  • 01 Aug 2023 02:01 PM (IST)

    मागच्यावेळी शिंदे, पवार अन् माझा रोल वेगळा होता पण...

    मागच्यावेळी अजितदादा, एकनाश शिंदे आणि मी इथे होतो. त्यावेळी तिघांचे रोल वेगळे होते. मी विरोधीपक्षनेता होतो, अजितदादा उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री होते. पण आज पुण्याच्या स्वप्नांना गती देण्यासाठी आम्ही तिघे एकत्र आल्याचे फडणवीस म्हणाले. पुणे मेट्रोचा आणखी एक टप्पा सुरु होतोय. याआधी मोदींच्या हस्ते भूमिपूजन झालं. त्यानंतर पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आणि आज दुसऱ्या टप्प्याची सुरुवात, उद्घाटन मोदीच करत आहेत.

  • 01 Aug 2023 01:59 PM (IST)

    मोदींच्या हस्ते विकासकामांचं लोकार्पण

    लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर विविध विकासकामाचं लोकार्पण केले जाणार आहेत. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण केले. ते म्हणाले की, मोदींच्या विकासाला गती देण्याचे काम मोदींनी केले आहे. आज अनेकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे दिली जाणार आहे. ती कृपाकरून विकण्याचा विचार करू नये असे म्हणत आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा, त्यांना चांगले नागरिक बनवा असे सांगितले.

  • 01 Aug 2023 01:17 PM (IST)

    40 हजार लोकांनी टिळकांच गुजरातमध्ये स्वागत केलं होतं - मोदी

    मोदींनी यावेळी सांगितले की, स्वातंत्र्य लढ्याच्यावेळी लोकमान्य टिळक गुजरातमध्ये आले होते. सरदार पटेलही टिळकांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. त्यावेळी 40 हजार लोकांनी टिळकांच गुजरातमध्ये स्वागत केल्याचे सांगत महाराष्ट्राप्रमाणे गुजरातच्या जनतेच टिळकांशी विशेष नात असल्याचे पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले.

  • 01 Aug 2023 01:08 PM (IST)

    लोकमान्य गंगाधर टिळकांकडे तरुणांना ओळखण्याची कला होती

    मोदी म्हणाले की, लोकमान्य गंगाधर टिळकांकडे तरुणांना ओळखण्याची कला होती, त्यांनी फक्त वीर सावरकरांना ओळखले, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. वीर सावरकरांनी परदेशात शिक्षण घेऊन परत आल्यानंतर देशसेवा करावी, अशी टिळकांची इच्छा होती. टिळकांनी वीर सावरकरांची शिफारस केली होती, तसेच त्यांनी राष्ट्र उभारणीला चालनादेखील दिली होती. लोकमान्य टिळकांना हेही ठाऊक होते की, स्वातंत्र्य चळवळ असो किंवा राष्ट्र उभारणीचे ध्येय असो, भविष्याची जबाबदारी नेहमीच तरुणांच्या खांद्यावर असते.

  • 01 Aug 2023 01:01 PM (IST)

    काशी आणि पुणे या दोघांची विशेष ओळख - मोदी

    काशी आणि पुणे या दोघांची विशेष ओळख आहे. विद्धवता इथे अमर आहे. पुणे विद्धवतेची ओळख. इथे हा सन्मान होणं हा आयुष्यातील समाधानाच क्षण. पुरस्कार मिळाल्यानंतर जबाबदारी वाढते, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. लोकमान्य टिळकांची छाप प्रत्येक ठिकाणी होती. टिळकांनी भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाची दिशा बदलली. भारतीय देश चालवू शकत नाही असं इंग्रज म्हणायचे. त्यावेळी टिळक म्हणाले होते की, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे.

  • 01 Aug 2023 12:57 PM (IST)

    मी पुरस्कार राशि नमामि गंगे योजनेसाठी दान करणार - मोदी

    पुढे बोलताना मोदी म्हणाले की,  मी पुरस्कार राशि नमामि गंगे योजनेसाठी दान देण्याचा निर्णय घेतला आहे. मी येथे येऊन जितका उत्साहित आहे, तितकाच भावूक असून, हा पुरस्कार १४० कोटी भारतीयांसाठी समर्पित करतो असे मोदींनी यावेळी सांगितले. पुण्याच्या पावन भूमीवर आणि महाराष्ट्र धर्तीवर येण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य असल्याचे ते म्हणाले. ही पुण्यभूमी छत्रपती शिवाजी महाराज, चाफेकर बंधू , सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांची भूमी आहे. या सर्वांना मी नमन करतो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube