No Entry 2: बोनी कपूरने अनिल कपूरसोबतच्या वादावर सोडल मौन; म्हणाला, ‘मला धक्का बसला…’

No Entry 2: बोनी कपूरने अनिल कपूरसोबतच्या वादावर सोडल मौन; म्हणाला, ‘मला धक्का बसला…’

Boney Kapoor On Anil Kapoor: 2005 साली प्रदर्शित झालेला ‘नो एन्ट्री’ (No Entry ) हा कॉमेडी सिनेमा खूप गाजला होता. सलमान खान, अनिल कपूर (Anil Kapoor), फरदीन खान, लारा दत्ता, बिपाशा बासू, सेलिना जेटली अशी या सिनेमाची स्टार कास्ट होती. या सिनेमातील गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. आजही हा सिनेमा तितकाच लोकप्रिय आहे. आता जवळपास 19 वर्षांनी ‘नो एन्ट्री’च्या सीक्वलची चर्चा रंगली आहे. ‘नो एन्ट्री 2’ (No Entry sequel) सिक्वेलमध्ये मेगास्टारला कास्ट का नाही केलं? आणि अनिल कपूर त्याच्यावर “रागात आहेत” अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली होती. पण याबद्दल बोनी कपूरने आता मौन सोडल आहे.

“मला धक्का बसला आणि आश्चर्य वाटले की अतिशय हा मुद्दा खूप गंभीरपणे घेतला. जेव्हा मी म्हटलं की अभिनेता अनिल कपूर माझ्यावर रागावला आहे, तेव्हा वस्तुस्थिती अशी आहे की मी ज्या चित्रपटाचा प्रस्ताव देत आहे, त्यात सलमान खान किंवा अनिल नाही. कारण ते दोघेही खूप व्यस्त अभिनेते आहेत.

त्यामुळे त्यांच्यासोबत बनवण्याचा विचार करण्याऐवजी मी तरुण पिढीसोबत सिक्वेल बनवण्याचा निर्णय घेतला” अस बोनी कपूरने शेअर केले. ते पुढे म्हणाले, त्यापैकी कोणीही माझ्यावर नाराज होऊ शकते कारण ते ‘नो एंट्री’च्या सिक्वेलचा भाग नाहीत, असा विचार करणे ही कल्पना पूर्णपणे मूर्ख आणि हास्यास्पद आहे. नो एन्ट्री सिक्वेलला त्यांची गरज भासेल पण त्यांना सिक्वेलची गरज नाही. ही टिप्पणी स्पष्टपणे केवळ विनोदाने बोलली गेली आहे.

विद्या बालन आणि प्रतीक गांधी यांच्यातील अफलातून केमिस्ट्री; ‘दो और दो प्यार’ मधील गाणे रिलीज

बोनी म्हणाले की अनिल “एक व्यस्त स्टार आहे”, जो “त्याच्या कारकिर्दीतील सर्वोच्च शिखरांपैकी एक” आहे. “मला माहीत आहे की पुढची दोन वर्षे अनिलकडे अजिबात तारखा उपलब्ध नाहीत. वर्क फ्रंटवर अनिल कपूर सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित त्याच्या आगामी ‘सुभेदार’ चित्रपटात दिसणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज