“फडणवीसांनी आता मणिपूर फाइल्स चित्रपट काढावा, खर्च मी करतो”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

“फडणवीसांनी आता मणिपूर फाइल्स चित्रपट काढावा, खर्च मी करतो”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

Uddhav Thackeray replies Devendra Fadnavis : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटावरून (Swatantra Veer Savarkar) जोरादार राजकारण सुरू झाले आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना खोचक टोला लगावला होता. राहुल गांधी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा सिनेमा पाहायला येत असतील तर मी माझ्या स्वत:च्या खर्चाने संपूर्ण थिएटर बुक करेल. राहुल गांधींना हा (Rahul Gandhi) सिनेमा पाहता येईल, अशी सगळी व्यवस्था करेन, असे फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता उद्धव ठाकरे यांनी जोरदार पलटवार केला आहे.

…तर राहुल गांधींसाठी संपूर्ण थिएटर बुक करेल; स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमा पाहिल्यावर फडणवीसांचा टोमणा

इंडिया आघाडीच्या रॅलीसाठी उद्धव ठाकरे दिल्लीत आहेत. येथे आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी भाजपसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका  केली. ‘मी फडणवीसांचा येण्याजाण्याचा आणि राहण्याचा सगळा खर्च करतो त्यांनी लडाख, मणिपूरला जावं. काश्मीरी पंडितांना भेटावं. त्यांनी मणिपूर फाइल्स चित्रपट काढावा खर्च मी करतो, असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

काय म्हणाले होते फडणवीस ?

राहुल गांधी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा सिनेमा पाहायला येत असतील तर मी माझ्या स्वत:च्या खर्चाने संपूर्ण थिएटर बुक करेल. राहुल गांधींना हा सिनेमा पाहता येईल, अशी सगळी व्यवस्था करेन. आजच्या कमर्शियल काळात सावरकरांवर सिनेमा येतो, ही चांगली बाब आहे. या सगळ्या कलाकारांनी त्यांच्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. सावरकरांचं जात-पात, धर्म, विज्ञान याविषय़ीचं लेखन चिंतनशील आहे. त्यांनी क्रांतीकारंकांची एक फळी तयारी केली होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक कंगोरे होते. सावरकर हे समाजसेवक, देशभक्त होतेच. याशिवाय, त्यांनी मराठी भाषेला समृध्द करण्याचं कामंही केल्याचे फडणवीस म्हणाले होते.

Devendra Fadnavis : ‘एक जागा अडली की तीन अडतात’; फडणवीसांनी सांगितला जागावाटपाचा तिढा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज