Devendra Fadnavis : ‘एक जागा अडली की तीन अडतात’; फडणवीसांनी सांगितला जागावाटपाचा तिढा

Devendra Fadnavis : ‘एक जागा अडली की तीन अडतात’; फडणवीसांनी सांगितला जागावाटपाचा तिढा

Devendra Fadnavis on Mahayuti Seat Sharing : राज्यात महायुतीचं जागावाटप अजूनही रखडलेलं आहे. काही जागांवर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे अंतिम निर्णय झालेला नाही. तरीदेखील ज्या जागांवर काही वाद नाहीत अशा ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. जागावाटपाच्या या तिढ्यावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केलं. माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी जागावाटपाबाबत माहिती दिली.

महायुतीला अजूनही धाराशिवचा उमेदवार जाहीर करता आलेला नाही. महायुतीचं जागावाटप कुठं अडलं आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारले. यावर फडणवीस म्हणाले, चार पाच जागांवर आमचं अडलंय हे खरं आहे. एक जागा अडली की तीन जागा अडतात. फार अडलंय असं नाही येत्या एक दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल, असे फडणवीस म्हणाले.

सध्या चार ते पाच जागांवर अडलं आहे हे खरं आहे. एक जागा अडली की तीन जागा अडतात. आता आमच्या काही जागा घोषित झाल्या आहेत. राष्ट्रवादीही लवकरच घोषणा करणार आहे. फार अडलं आहे अशी परिस्थिती नाही. त्यामुळे एक दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.

Devendra Fadanvis : पत्नीनंतर फडणवीसही गाण्यात मागे नाही; महाशिवरात्रीनिमित्त फडणवीस लिखित ‘देवाधि देव’रिलीज

अंबादास दानवे संपर्कात नाहीत 

मराठवाड्यातील मोठ्या नेत्याचा पक्षात प्रवेश आधीच झालाय. या व्यतिरिक्त आणखी कुठला नेता आता प्रवेश करील असं वाटत नाही. तुम्ही माध्यमं अंबादास दानवे यांची चर्चा करताय. पण, आम्ही जर ऑपरेशन केलं तर तुम्हाला कळतच नाही आणि तुम्हाला कळलं तर लक्षात ठेवा ऑपरेशन नाही. त्यामुळे अंबादास दानवे यांच्याबरोबर आमचा कोणताही संपर्क नाही. त्यांच्या प्रवेशाची आमच्याकडे कोणतीच चर्चा नाही, अशा स्पष्ट शब्दांत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मराठवाड्यातील आणखी एक मोठ्या भूकंपाच्या चर्चा फेटाळून लावल्या.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज