लोकसभेचं तिकीट कापल्यानं भावना गवळी नाराज, शिंदेंनी दिली ग्वाही; म्हणाले, ‘वाऱ्यावर सोडणार नाही…’

लोकसभेचं तिकीट कापल्यानं भावना गवळी नाराज, शिंदेंनी दिली ग्वाही; म्हणाले, ‘वाऱ्यावर सोडणार नाही…’

Eknath Shinde on Bhavana Gawali : यवतमाळ-वाशीम लोकसभा (Yavatmal-Washim Lok Sabha) मतदारसंघातून विद्यमान खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांच्या जागी शिंदे गटाने राजश्री पाटील (Rajshree Patil) यांना उमेदवारी दिली. या निर्णयामुळे भावना गवळी प्रचंड नाराज आहेत. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी (Eknath Shinde) भावना गवळींच्या नाराजीवर प्रतिक्रिया दिली.

UdayanRaje Bhosle : ‘शरद पवार माझ्या बारशाला आले होते, पण मी आता बच्चा राहिलेलो नाही’ 

राजश्री पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यवतमाळ येथे आले होते. त्यांच्यासोबत मंत्री संजय राठोड, मदन येरावार, दादा भुसे आदी नेते उपस्थित होते. मात्र, नामांकनाच्या वेळी भावना गवळीही अनुपस्थित राहिल्या. त्यामुळं गवळी यांची नाराजी कायम असल्याचं दिसतं. याविषयी विचारलं असता शिंदे भावना गवळींना वाऱ्यावर सोडणार नाही, असं सांगितलं.

Dharashiv Loksabha : पती भाजपचा आमदार अन् पत्नी राष्ट्रवादीच्या उमेदवार; निंबाळकर VS पाटलांमध्ये लढत 

आज माध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, भावना गवळी यांनी अनेक कामे मार्गी लावलेली आहेत. त्यांनी मतदारसंघात मोठी कामे केली आहे. त्यांनी केलेल्या कामाचा राजश्री पाटलांना लाभ होईल. राजकारणातील समीकरण जुळवून आणण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. मात्र, कोणाचीही वाऱ्यावर सोडणार नाही. एक भाऊ म्हणून भावना गवळींनाही शब्द देतो की, त्यांनाही योग्य सन्मान दिला जाईल. त्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक असून शब्दावर ठाम राहणारा कार्यकर्ता आहे. त्या राजश्री पाटलांना नक्कीच मदत करतील, अशी अपेक्षा एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली.

दरम्यान, भावना गवळींनी उमेदवारी मिळवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी भेट घेतली होती. त्यांनी उमेदवारी संदर्भात फडणवीसांशी चर्चा केली होती. हा प्रयत्न फसल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली होती. मात्र, शिंदे गटाने राजश्री पाटील यांना उमदेवारी दिली. त्यामुळं गवळी यांचे सर्व प्रयत्न फोल ठरले. यवतमाळ-वाशीममधून ठाकरे गटाने संजय देशमुख यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे राजश्री पाटील विरुद्ध संजय देशमुख अशी लढत होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज