‘ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन माहिती देणार…’ भुजबळांनी घेतली सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट

‘ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन माहिती देणार…’ भुजबळांनी घेतली सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट

Chhagan Bhujbal Visit Somnath Suryawanshi Famil : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आलीय. माजी मंत्री छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) आज परभरणीत (Parbhani) जावून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेतलीय. सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi) मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन माहिती देणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

श्रेया चौधरीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार, ‘बंदिश बँडिट्स सीझन 2’ मधील अभिनयाने जिंकली प्रेक्षकांची मने

राज्यपालांच्या अभिभाषनाच्या वेळेस मी जे काही उदाहरण दिले होते. त्यामध्ये परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी हे प्रकरण होतं. मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. कारवाई केली पाहिजे, माणसं माणसासारखीच (Maharashtra Politics) असतात. मी आज त्यांच्या आईची भेट घेतली आहे. या प्रकरणामध्ये वेळोवेळी जी माहिती मिळेल, ती माहिती मी घेणार आहे. घडलेल्या घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांना देणार आहे, असं वक्तव्य माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली आहे. परभणी हिंसाचार प्रकरणामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला होता. हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्याविषयीची बाजू मांडली होती.

पडळकर म्हणाले जयंतरावांनी बँक लुटली; जयंत पाटील म्हणाले एखाद्यानं भुंकायचं ठरवलं तर ते भुंकतात

याप्रकरणी दबाव वाढल्यानंतर तीन पोलिसांचं निलंबन करण्यात आलं होतं. सूर्यवंशी यांच्या कुटुंबाने पोलीस प्रशासनाच्या कारवाईवर संशय उपस्थित केलाय. त्यांनी याप्रकरणी कारवाईची मागणी केलीय. त्यानंतर आज राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे परभणीत होते. त्यांनी सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची आणि त्यांच्या आईची भेट घेतलेली आहे. सूर्यवंशी यांच्या कुटुंबासमवेत संवाद साधला आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी छगन भुजबळ पुण्यात होते. जो कोणी दोषी असेल, त्याच्यावर नक्कीच कारवाई होईल, असं आश्वासन छगन भुजबळ यांनी दिलं आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube