पडळकर म्हणाले जयंतरावांनी बँक लुटली; जयंत पाटील म्हणाले एखाद्यानं भुंकायचं ठरवलं तर ते भुंकतात

पडळकर म्हणाले जयंतरावांनी बँक लुटली; जयंत पाटील म्हणाले एखाद्यानं भुंकायचं ठरवलं तर ते भुंकतात

Gopichand Padalkar vs Jayant Patil : आमदार गोपीचंद पडळकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस (Jayant Patil) शरदचंद्र पवार पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चांगलाच टोला लगावला आहे. ते म्हणाले, भुंकणारे भुंकतच राहतात, आपण आपल्या चालीनं चालायचं असतं. ते माध्यमांशी बोलत होते.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील नेतृत्व करीत असलेल्या सांगली जिल्हा बँकेत भ्रष्टाचाराचा आरोप केला. तसेच जयंत पाटील यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली होती. गेले काही दिवस दोघांमध्ये जोरदार टीकायुद्ध सुरू असून त्याचे पडसाद मुंबईत विधिमंडळ अधिवेशनादरम्यानही उमटत आहेत.

सांगली जिल्हा बँक गैरव्यवहाराची पुन्हा चौकशी

आमदार जयंत पाटील यांच्यावर सातत्याने कठोर शब्दांत टीका करीत असतात. आमदार पडळकर यांनी शुक्रवारी वृत्तवाहिन्यांवर बोलतानाही जोरदार टीका केली होती. सांगली जिल्ह्यात कोणत्याही सभा किंवा कार्यक्रमात हे वाक युद्ध सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांनी पडळकर यांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा दिला आहे.

आमदार पडळकर यांनी सांगली जिल्हा बॅंक गैरव्यवहाराचे कर्ते जयंत पाटील असून त्यांनी बँक लुटली असून राज्य शासनने चौकशी करावी, अशी मागणी केली. आमदार पाटील या टीकेवर म्हणाले, ‘‘सांगली जिल्हा बॅंकेबाबत टीका केली असेल तर ठीक आहे, त्याच्यावर मी काही बोलत नाही, त्याने मला काही फरक पडत नाही.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या आरोपाची चौकशी होईल ना. करू द्या ना. चौकशीला कोणी घाबरतंय की काय? एखाद्याने भुंकायचेच ठरवले असेल तर तो भुंकत राहतो. आपण आपल्या चालीने चालायचं असतं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube