Lata Deenanath Mangeshkar Award सोहळ्याचे काही खास क्षण; पाहा फोटो…

1 / 8

मुंबईत लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार (Lata Deenanath Mangeshkar Award ) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

2 / 8

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे राष्ट्र आणि समाजासाठी काही चांगले काम करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.

3 / 8

यावेळी लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार अमिताभ बच्चन यांना मिळाला आहे.

4 / 8

या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते.

5 / 8

मंगेशकर यांचे धाकटे भाऊ आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकर दरवर्षी या सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषवतात.

6 / 8

तर मान्यवरांना मास्टर दीनानाथ मंगेशकर, मोहन वाघ पुरस्कार, आशा भोसले पुरस्कृत आनंदमयी पुरस्कार, वाग्विलासिनी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

7 / 8

त्यामध्ये मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा ए आर रहमान (प्रदीर्घ संगीत सेवा), अशोक सराफ (प्रदीर्घ नाट्य-चित्रपट सेवा), पद्मिनी कोल्हापुरेम (प्रदीर्घ चित्रपट सेवा), रुपकुमार राठोड (प्रदीर्घ संगीत सेवा), अतुल परचुरे (प्रदीर्घ नाट्यसेवा), रणदीप हुड्डा (उत्कृष्ट चित्रपट निर्मिती) विशेष पुरस्कार, भाऊ तोरसेकर (प्रदीर्घ पत्रकारिता), रुपकुमार राठोड (प्रदीर्घ संगीत सेवा) यांना देण्यात आला.

8 / 8

तर मोहन वाघ पुरस्कार- नाटक गालिब (उत्कृष्ट नाट्यनिर्मिती २०२३-२४), आशा भोसले पुरस्कृत आनंदमयी पुरस्कार- दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबल (समाजसेवा),वाग्विलासिनी पुरस्कार- श्रीमती मंजिरी फडके (प्रदीर्घ साहित्य सेवा), मोहन वाघ पुरस्कार- नाटक गालिब (उत्कृष्ट नाट्यनिर्मिती २०२३-२४) यांना देण्यात आला.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube