Video : भाजपची साथ सोडा अन् आमच्यासोबत या!; ‘वंचित’ ची अजितदादांना खुली ऑफर
मुंबई : महायुतीत अजितदादांचे खच्चीकरण होत आहे. त्यामुळे त्यांनी आता प्रकाश आंबेडकरांसोबत (Prakash Ambedkar) जावं असे विधान अजित पवारांचे विश्वासू आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर राजकीय खळबळ उडाली होती. आता या विधानावर वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठाकूर यांनी काही कारणे सांगत मिटकरींच्या विधानाला एकप्रकारे दुजोरा दिला असून, अजितदादांंनी भाजपची साथ सोडावी आणि आमच्यासोबत यावे अशी खुली ऑफर दिली आहे. (VBA State President Rekha Thakur On Amol Mitkari Statement )
मोठी बातमी : मृदा, जलसंधारण विभागातील पदांसाठी फेरपरीक्षा; राज्य सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा
काय म्हणाले होते मिटकरी?
अजित पवार आणि महायुतीबाबत अकोल्यात एका वृत्तवाहिनीशी बोलताना मिटकरी म्हणाले होते की, महायुतीत अजितदादांना (Ajit Pawar) एकटं पाडण्याचा प्रयत्न होत आहे. एवढेच काय तर, काहीही करून त्यांनी महायुती सोडावी यासाठी दोन्ही मित्र पक्षातील काही लोक प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोपही मिटकरी यांनी केला होता. अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावे यासाठी काहीजण मानसिक खच्चीकरण करण्याचाही प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.
आंबेडकर, अजितदादा महाराष्ट्राचं राजकारण बदलतील
महायुतीतून अजितदादा बाहेर पडले आणि प्रकाश आंबेडकर आणि अजितदादा एकत्र आले तर, विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही नेते महाराष्ट्राचं राजकारण बदलवून शकतील असा विश्वासह मिटकरी यांनी बोलताना व्यक्त केला होता.
Maratha Vs OBC : आता थेट मंडल आयोग रद्द करण्यासाठी मैदानात उतरणार; जरांगेही भडकले
तोपर्यंत अजितदादा आणि वंचित एकत्र येणार नाही
मिटकरी यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, आता मिटकरींच्या विधानावर वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या की, वंचित बहुजन आघाडी आणि अजित पवार गट एकत्रित येण्यासंबंधी अमोल मिटकरींनी विधान केले आहे. पण, सध्या अजित पवार यांचा पक्ष भाजपसोबत युतीमध्ये आहे. या परिस्थितीत वंचित त्यांना सोबत घेण्याचा विचार करू शकणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडी प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे भाजपसोबत मैत्री ठेवण्याच्या विरोधात आहे. त्यामुळे जोपर्यंत अजित पवार गट भाजपसोबत संबंध तोडत नाही तोपर्यंत मिटकींच्या विधानावर गांभीर्याने विचार करता येणार नसल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.
अमोल मिटकरी यांच्या विधानानंतर राजकीय खळबळ उडाली होती. आता यावर वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. #ajitpwar #amolmitkari #VBA #Prakashambedkar #Mahayuti pic.twitter.com/jbo5y86uSj
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) June 22, 2024