Ajit Pawar : ‘धाकल्या’ पवारांची झाकली मूठ सव्वा लाखाची अखेर उघडी

Ajit Pawar : ‘धाकल्या’ पवारांची झाकली मूठ सव्वा लाखाची अखेर उघडी

Ajit Pawar Lok Sabha Election Results 20024: ‘पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच मी बघतो,’ असे शब्द अजित पवार (Ajit Pawar) लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) प्रचारात वापरत होते. आणि आपल्याच काकांना रिटायर्ड करण्याची भाषाही देखील त्यांना चांगलीच महागात पडली. अजित पवारांची ही ‘दादागिरीची’भाषा शेवटी काय मतदारांना पटली नाही.

आई, वडिलांना न सांभाळता घराबाहेर काढण्याची प्रथा सध्या दिसत आहे. आणि तेच पुढे उपमुख्यमंत्री अजित पवार राजकारणात केले आहेत. स्वत:च्यांना काका शरद पवार यांना त्यांच्या स्वतःच्या पक्षातून हकालपट्टी करत 41 आमदारांच्या मदतीने त्यांनी राष्ट्रवादी मुठीत घेतली.भाजप (BJP) अजित पवारांना तुरुंगात टाकायला निघाली होती. मात्र,तेच भाजपवाले दांदाना क्लीन चिट देत उपमुख्यमंत्री केले.

पुढे भाजपने चाल करत बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवत तेथेही शरद पवारांसोबत रिंगणात उतरत दोन हात केले. पण, रिटायर्ड संबोधले गेलेल्या शरद पवार जिंकले व अजित पवार चांगलेच तोंडावर आपटले. अजित पवार गटाने महायुतीत बारामती, शिरुर, धाराशिव आणि रायगड या चार जागा लढवल्या. परभणीची जागा पक्षाच्या कोट्यातून महादेव जानकर यांना देण्यात आली होती. पंरतु ती देखील जागा त्यांना मिळाली नाही. पुढे रायगड वगळता कोणतीच जागा अजित पवारांच्या पदरात पडली नाही.

रायगडमध्ये सुनील तटकरे स्वतःच्या ताकदीमुळे जिंकले. या निकालाने छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ या नेत्यांना आता अजित पवार यांच्याबरोबर राहायचं की पु्न्हा शरद पवारांनी साथ द्यायची याचा विचार करण्याची वेळ आली आहे. तसेच सोबत असलेले इतर आमदार किती काळ अजित पवारांसोबत राहतील याची चांगलीच चर्चा रंगली आहे. शरद पवार, रोहित पवार यांना देखील थेट ईडीची नोटीस देत चौकशीला बोलविण्यात आले. परंतु आपण मात्र उत्तम आणि स्वच्छ असल्याचे अजित दादांनी यावेळी दाखवलं आणि थेट भाजपसोबत घरोबा केला.

मराठवाड्याचा ‘जरांगे पाटील फॅक्टर’; दिग्गज नेत्यांचा पराभव, भाजपला केलं हद्दपार

या फोडाफोडीच्या राजकारणामुळे राज्यात भाजप, शिंदे गट व अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. शरद पवारांना पर्याय म्हणून अजितदादांना प्रोजेक्ट करण्याचा एक मनसूबा भाजपाचा होता मात्र थोरल्या पवारांचं नाणं अजूनही खणखणीत आहे हेच या निवडणुकीनं दाखवून दिलं आहे. पुढे आणखी एक मराठा नेता म्हणून CM एकनाथ शिंदे यांची कामगिरी तुलनेने उत्तम ठरली. मात्र अजित पवारांना तशी कामगिरी करता आली नाही. राज्यात शरद पवार आजही राजकारणातील हुकूमी एक्का आहेत. त्यांच्याच नावाचा राजकारणात दबदबा आहे. म्हणून तर पंतप्रधान मोदींनी सभा घेतल्या तरी शरद पवारांनी दिलेले उमेदवार ते पाडू शकले नाहीत. असं कौशल्य अजितदादांच्या राजकारणात अजून तरी दिसत नाही.

अजित पवारांनीही निवडणुकीत प्रचार केला. पण त्यांना बारामतीत पत्नी सुनेत्रा पवार यांनी काही निवडून आणता आलं नाही. शिरुरमध्ये उमेदवार नाही म्हणून आढळरावांना पक्षात घेतलं. तिकीट दिलं. त्यांच्यासाठी प्रचारही केला. आढळरावांवर ज्यांची नाराजी होती ती घालवण्याचंही कामही केलं. तरी देखील शिरुरमध्ये शरद पवारांनी अमोल कोल्हेंना निवडून आणत तुतारी वाजवलीच.अरुणाचल प्रदेशमध्ये दादांच्या राष्ट्रवादीचे तीन आमदार विजयी झाले. मात्र विधानसभेला महाराष्ट्रात त्यांचे किती आमदार येणार? हे आता भविष्यात पाहायला मिळाले का? हे पाहणे खूप उत्सुकतेचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube