मराठवाड्याचा ‘जरांगे पाटील फॅक्टर’; दिग्गज नेत्यांचा पराभव, भाजपला केलं हद्दपार

मराठवाड्याचा ‘जरांगे पाटील फॅक्टर’; दिग्गज नेत्यांचा पराभव, भाजपला केलं हद्दपार

Marathwada Lok Sabha Election Result 2024 : मराठवाडा बदललाय. मागच्या 10 वर्षात महायुतीवर भरभरून प्रेम करणारऱ्या मराठवाड्याने भाजपला मात्र आता खड्यासारखे बाजूला केलय. ते इतक बाजूला केलय की कालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मराठवाड्यात भोपळा मिळालाय. छत्रपती संभाजीनगरची महायुतीची जागा सोडली तर मराठवाड्यातून महायुती विषेशत: भाजप हद्दपार झालाय. यामध्ये लातूर, नांदेड, जालना आणि बीड हे जिल्हे महाविकास आघाडीने खेचून आणले आहेत. दरम्यान, या जिल्ह्यात भाजपचे बालेकिल्ले म्हणून ओळखणाऱ्या बीड आणि जालना या जिल्ह्यात एक केंद्रीय मंत्री, आणि एक राज्यातील माजी कॅबीनेट मंत्र्यांचा दारून पराभव झालाय. यामधून लक्षात येते ती गोष्ट म्हणजे मराठवाडा, आम्ही जी कुरघोडी करणार ती तुम्ही सहन करा, आम्ही ठरवतोल ते धोरण, आम्ही देऊ तोच उमेदवार या सगळ्या गोष्टींना अखेर मराठवाड्याने हद्दपार केलं.

जरांगे यांचा प्रभाव    बीड लोकसभेत थरारक सामना! बजरंग सोनवणेंचा विजय; पंकजा मुंडेंचा निसटता पराभव

लोकसभा निवडणुकीच्या अगोदरपासून मराठवाड्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा प्रभाव मराठवाड्यात पाहायला मिळाला. मराठा समाजाला यश मिळवून देण्यासाठीची त्यांची लढाई आणखी सुरूच आहे. मात्र, त्यांचं सर्वात मोठ यश म्हणजे समाज एकत्र करणं आणि त्याला एका मुद्यावरून त्याच्या तीव्रतेची जाणीव करून देणं आहे. आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले. त्यामुळे त्यांनी निर्माण केलेल्या वादळात अनेक दिग्गजांचा पराभव झालाय. जालना जिल्ह्यातून भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा हुकलेला षटकार, उमेदवार बदललेला असला तरी बीड जिल्ह्यातही भाजपला मोठा हादरा बसलाय. त्याचबरोबर 2014 पासून लातूर जिल्ह्यात भाजपने चांगलाच शिरकाव केला होता. तेथेही यावेळी काँग्रेसने बाजी मारली आहे. तसंच, दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्यापासून नांदेडचा बालेकिल्ला ओळखल्या जाणाऱ्या आणि त्यांचे चिरंजीव माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या होम ग्राऊंडलाही काँग्रेसनेच बाजी मारली. येथे अशोक चव्हाण भाजपात गेले. मात्र, त्याचा काहीही परिणाम झाला नाही.

आयात उमेदवार फेल 

हे सगळ चित्र लक्षात घेता दुष्काळी भाग असलेल्या मराठवाड्याने आयात केलेल्या उमेदवारांना थेट नाकारलं आहे. यामध्ये बसवराज पाटील, अर्चना पाटील, अशोक चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांना भाजपने जवळ केलं. मात्र, त्याचा काहीही परिणाम दिसून आला नाही. कारण दुष्काळी स्थिती. या नेत्यांचं कायम त्याकडे दुर्लक्ष. कित्येक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला असताना कुणाचंही तिकडे लक्ष नाही. त्याचबरोबर मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या होत असताना त्यावरही काही ठोस पावलं नाहीत. त्याचबरोबर मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडला असताना त्याला न दिलेली साथ या सगळ्या विषयांचा रोष मराठवाड्याच्या मतदारांच्या मनात होता. अखेर त्यांनी तो मतपेटीतून व्यक्त केला आणि मराठवाडा भाजपमुक्त झाला.

मराठवाड्यातून निवडून आलेले खासदार

शिवसेना (उद्धव ठाकरे)

  • धाराशिव – ओम राजेनिंबाळकर यांचा ती लाखांहून अधिक फरकाने विजय
  • हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर यांचा एक लाखाच्या फरकाने विजय
  • परभणी – संजय जाधव यांचा तिसऱ्यांदा विजय

काँग्रेस

  • लातूर – डॉ. शिवाजीराव काळगे
  • नांदेड – वसंत चव्हाण
  • जालना – कल्याण काळे

राष्ट्रवादी शरद पवार

  • बीड – बजरंग सोनवणे

शिवसेना (एकनाथ शिंदे)

  • छत्रपती संभाजीनगर – संदिपान भुमरे

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज