बीड लोकसभेत थरारक सामना! बजरंग सोनवणेंचा विजय; पंकजा मुंडेंचा निसटता पराभव

बीड लोकसभेत थरारक सामना! बजरंग सोनवणेंचा विजय; पंकजा मुंडेंचा निसटता पराभव
Beed Lok Sabha 2024 Result Update : राज्याचेचं नाही तर देशाचं लक्ष लागलेली लढत म्हणजे बीड लोकसभा निवडणूक. येथे मोठा जातीय संघर्ष पाहायला मिळात. ओपन विरूद्ध ओबीसी असा थेट संघर्ष येथे पाहायला मिळाला. त्यामध्ये निवडणूक जाहीर झाल्यापासून टोकाचा प्रचार झाला. टोकाचे आरोप प्रत्यारोप झाले. जातीय समिकरणांवरूनही मोठा संघर्ष पाहायला मिळाला. दरम्यान, या मोठा ठाकाच्या जातीय संघर्षाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांनी बाजी मारली आहे. येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा मोठा प्रभाव पाहायला मिळाला. मनोज जरांगे यांचं मूळ गाव बीड जिल्ह्यात असल्याने त्यांच्या आंदोलनाचा मोठा प्रभाव पाहायला मिळाला.
Latur Lok Sabha Result :  मराठवाड्यात भाजपसाठी मोठा धक्कादायक निकाल लागाल आहे. विलासराव देशमुखांचा हा जिल्हा कायम काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, 2014 नंतर येथे हवा बदलली होती. येथे भाजपचा शिरकाव झाला होता. मात्र, यावेळी महाविकास आघाडीचे शिवाजीराव काळगे यांनी विजयी पताका फडकवली आहे. त्यांनी श्रृगांरे यांचा 50 हजारपेक्षा अधिक मताधिक्यांनी पराभ केला आहे.

Jalana Loksabha Result : मराठवाड्यात चर्चेत असलेला लोकसभा मतदारसंघ म्हणजे जालना मतदारसंघ. येथे भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे सहाव्यांदा मैदानात होते. या जागेवर दानवे यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. या जागेवरून काँग्रसचे नेते कल्याणराव काळे हे विजयी झाले आहेत. काळे यांनी दानवे यांचा 90 हजारपेक्षा अधिक मतांच्या फरकाने पराभव केला आहे.

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Result :  छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात पाच तगड्या उमेदवारांमध्ये लढत झाली आहे. यामध्ये अखेर महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांनी विजय मिळवला आहे. आपली ही निवडणूक शेवटची निवडणूक आहे असं म्हणालेले चंद्रकात खैरे सलग दुसऱ्यांदा पराभूत झाले आहेत.
Dharashiv Lok Sabha Result : धाराशीव या जागेवर भाजपने अर्चना पाटील यांना तिकीट दिले होते. तर उद्धव ठाकरे यांच्याशिवसेनेकडून ओमराजे निंबाळकर हे मैदानात होते. या जागेवर ओमराजे यांनी तब्बल 3 लाख मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. भाजपसाठी हा पराभव धक्कादायक असल्याचे म्हटले जातेय.
Nanded Lok Sabha Result : भाजपचे नेते तथा खासदार अशोक चव्हाण यांच्यासाठी नांदेड ही जागा प्रतिष्ठेची होती. भाजपने या जागेवरून प्रतापराव चिखलीकर यांना तिकीट दिले होते. मात्र या जागेवर काँग्रेसचे नेते वसंतराव चव्हाण हे विजयी झाले आहेत. चव्हाण यांचा 25 हजारांच्या मताधिक्याने विजय झाला आहे
Hingoli Lok Sabha Result :  राठवाड्यातील हिंगोली या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या जागेसाठी महायुतीकडून शिंदे गटाचे उमेदवार बाबुराव कोहळीकर हे मैदानात होते. तर महायुतीकडून नागेश आष्टीकर हे निवडणूक लढवत होते. त्यांनी ठाकरे गाटाच्या शिवसेनेने तिकीट दिले होते. दरम्यान, या जागेवर ठाकरे यांच्या आष्टाकीर यांनी बाजी मारली आहे. त्यांनी कोहळीकर यांचा एक लाख मताधिक्याने पराभव केलाय.
Parbhani Lok Sabha Result : परभणी या जागेवर राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते रावसाहेब दानवे हे महायुतीकडून उभे होते. त्यांच्या विजयासाठी नरेंद्र मोदी यांनीदेखील परभणीत सभा घेतल्या होत्या. पण त्यांचा येथून धक्कादायक पराभव झाला आहे. या जागेवरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संजय जाधव हे विजयी झाले आहेत. जाधव यांचा 1 लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय झाला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube