Lok Sabha Election Result Live : बीडमध्ये पंकजा मुंडे पराभूत, बजरंग सोनवणे सात हजार मतांनी विजयी

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

  • Written By: Published:
Loksabha Election Result Live Update

Lok Sabha Election Result Live Update : लोकसभा निवडणूक (Loksabha Election Result) निकाल 2024 ची मतमोजणीला सकाळी 8 वाजेपासून सुरूवात झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांसह दिग्गज उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. निकालापूर्वी समोर आलेल्या एक्झिट पोलनुसार देशात एनडीएची सत्ता स्थापन होईल असा अंदाज वर्तवण्यात आली आहे. तर, महाराष्ट्रात महायुतीला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे देशात आणि महाराष्ट्रातील जनतेने नेमकी कुणाच्या हातात सत्ता दिली आहे याचे रिअल टाईम अपडेट देणारा लेट्सअपचा लाईव्ह ब्लॉग… (Loksabha Election Result Live Updates )

LIVE NEWS & UPDATES

  • 05 Jun 2024 02:46 PM (IST)

    महाराष्ट्रात पुन्हा कमबॅक करण्यासाठी मला सरकारमधून मोकळं करा - देवेंद्र फडणवीस

  • 04 Jun 2024 05:53 PM (IST)

    कल्याणमध्ये एकनाथ शिंदेंचे चिरंजीव श्रीकांत शिंदे विजयी

    कल्याणमध्ये पुन्हा शिंदेशाही, श्रीकांत शिंदेंच्या गळ्यात पडली विजयाची माळ. ठाण्याइतकाच कल्याण मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी महत्त्वाचा होता. श्रीकांत शिंदेंविरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांनी निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव झाला आहे.

  • 04 Jun 2024 05:45 PM (IST)

    नगरमध्ये मोठा उलटफेर; सुजय विखे यांचा पराभव

    नगरमध्ये मोठा उलटफेर; सुजय विखे यांचा पराभव शरद पवार गटाच्या निलेश लंकेंचा दणदणीत विजय निलेश लंकेंचा 25 हजाराच्या लीडने विजयी

  • 04 Jun 2024 05:41 PM (IST)

    वर्ध्यात अमर काळे विजयी; रामदास तडस यांना पराभवाचा धक्का

    वर्ध्यात अमर काळे ठरले जाएंट किलर; रामदास तडस यांना पराभवाचा धक्का

  • 04 Jun 2024 05:41 PM (IST)

    छत्रपती संभाजनगर : खैरे, जलील यांचा पराभव करत संदिपान भुमरे विजयी

    छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे विजयी झाले आहेत. येथील अटीतटीच्या लढतीत भुमरे यांनी एमआयएनचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील आणि ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला आहे.

  • 04 Jun 2024 05:25 PM (IST)

    दक्षिण मुंबईचा गड अरविंद सावंतांनी राखला

    दक्षिण मुंबईचा गड अरविंद सावंतांनी राखला; यामिनी जाधवांचा दारुण पराभव!

  • 04 Jun 2024 05:25 PM (IST)

    आतापर्यंत विजयी झालेले उमेदवार :::

    पुणे – मुरलीधर मोहोळ (भाजप)
    बारामती – सुप्रिया सुळे (शरदचंद्र पवार गट)
    मावळ – श्रीरंग बारणे (शिंदे गट शिवसेना)
    शिरूर – अमोल कोल्हे (शरदचंद्र पवार गट)
    शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे (ठाकरे गट)
    रायगड – सुनिल तटकरे (अजित पवार गट)
    मुंबई उत्तर पश्चिम – अमोल किर्तीकर (ठाकरे गट)
    अकोले – अनुप धोत्रे (भाजप)
    उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड (काँग्रेस)
    नाशिक – राजाभाऊ वाजे (ठाकरे गट)
    दिंडोरी – भास्कर भगरे (शरदचंद्र पवार गट)
    वर्धा – अमर काळे (काँग्रेस)
    बुलढाणा – प्रतापराव जाधव (भाजप)
    चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर (काँग्रेस)
    अमरावती – बळवंत वानखेडे (काँग्रेस )
    धाराशिव – ओमप्रकाश निंबाळकर
    पालघर – हेमंत सावरा (भाजप)
    रावेर – रक्षा खडसे (भाजप)
    रत्नागिरी- सिंधुदूर्ग - नारायण राणे (भाजप)
    नंदुरबार - गोपाल पाडवी (काँग्रेस)
    जळगाव – स्मित वाघ (भाजप)
    दक्षिण मध्य मुंबई – अनिस देसाई (ठाकरे गट)
    उत्तर मुंबई – पियुष गोयल (भाजप)
    कल्याण डोंबवली – डॉ.श्रीकांत शिंदे (शिंदे गट)
    ठाणे – नरेश म्हस्के (भाजप)
    सांगली – विशाल पाटील (अपक्ष)
    कोल्हापूर – छत्रपती शाहू महाराज (काँग्रेस)
    नागपूर – नितीन गडकरी (भाजप)

  • 04 Jun 2024 05:18 PM (IST)

    ओमराजे निंबाळकर यांनी मोडले सर्व रेकॉर्ड

    ओमराजे निंबाळकर यांना 2 लाख 95 हजार 288 मतांची विक्रमी लीड. ओमराजे यांना 6 लाख 74 हजार 812 मते तर अर्चना पाटील यांना 3 लाख 79 हजार 524 मते.

  • 04 Jun 2024 05:17 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

  • 04 Jun 2024 05:15 PM (IST)

    शिवराज सिंह चौहान यांनी रचला इतिहास!

    विदिशा मतदारसंघातून 8,20,868 मतांनी मिळवला विजय

  • 04 Jun 2024 05:13 PM (IST)

    अधीर रंजन चौधरी यांचा पराभव; माजी क्रिकेटपटूने केले पराभूत

    पश्चिम बंगालमधील बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचा पराभव झाला आहे. माजी क्रिकेटपटू आणि टीएमसीचे उमेदवार युसूफ पठाण या जागेवर विजयी झाले आहेत.

  • 04 Jun 2024 05:09 PM (IST)

    अमरावती काँग्रेसचे बळवंत वानखडे १० हजार १०३ मतांनी आघाडीवर, नवनीत राणा पिछाडीवर

    अमरावती काँग्रेसचे बळवंत वानखडे १० हजार १०३ मतांनी आघाडीवर, नवनीत राणा पिछाडीवर

  • 04 Jun 2024 05:09 PM (IST)

    शिंदे गटाचे उमेदवार संदिपान भुमरे ७६ हजार ४७२ मतांनी आघाडीवर

    शिंदे गटाचे उमेदवार संदिपान भुमरे ७६ हजार ४७२ मतांनी आघाडीवर,

  • 04 Jun 2024 05:03 PM (IST)

    22868 मतांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आघाडीवर

    अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपाचे उमेदवार खासदार सुजय विखे पिछाडीवर महाविकास आघाडीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांना 21 फेऱ्यांची 22868 मतांनी आघाडीवर आहेत

  • 04 Jun 2024 04:59 PM (IST)

    अकोल्यातून भाजपचे अनुप धोत्रे विजयी

    अकोल्यातून भाजपचे अनुप धोत्रे विजयी. अकोल्यातून भाजपचे अनुप धोत्रे विजयी. काँग्रेसचे डॉ. अभय पाटील यांचा केला पराभव. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा केला पराभव.

  • 04 Jun 2024 04:53 PM (IST)

    उज्वल निकम पराभूत वर्षा गायकवाड विजयी...

    उज्वल निकम पराभूत वर्षा गायकवाड विजयी...

  • 04 Jun 2024 04:53 PM (IST)

    नाशिकमध्ये मविआचे राजाभाऊ वाजे १ लाख ४५ हजार ७२ मतांनी आघाडीवर

    महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे १ लाख ४५ हजार ७२ मतांनी आघाडीवर

  • 04 Jun 2024 04:51 PM (IST)

    भंडारा गोंदियात काँग्रेस चे उमेदवार प्रशांत पडोळे आघाडीवर

    भंडारा गोंदियात काँग्रेस चे उमेदवार प्रशांत पडोळे आघाडीवर.. तर भाजपचे सुनील मेंढे पिछाड़ीवर; 14543 मतांनी पडोळे पुढे..
    भंडारा-गोंदिया पक्ष निहाय मत...

    1)सुनील मेंढे, भाजप - 341259
    2)ड़ॉ प्रशांत पडोळे, काँग्रेस- 355802

    काँग्रेस चे डॉ प्रशांत पडोळे यांचा विजय निच्छित

  • 04 Jun 2024 04:48 PM (IST)

    अकोल्यात 21 फेऱ्यांनंतरही प्रकाश आंबेडकर तिसऱ्या स्थानी

    अकोला मतदारसंघामध्ये 21 व्या फेरीमध्ये भाजपचे अनुप धोत्रे 23348 मतांनी आघाडीवर. काँग्रेसचे अभय पाटील दुसऱ्या क्रमांकावर तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर.

  • 04 Jun 2024 04:46 PM (IST)

    हातकणंगलेतून ध्यैर्यशील माने 10 हजार 713 मतांनी विजयी

    हातकणंगलेतून ध्यैर्यशील माने 10 हजार 713 मतांनी विजयी इचलकरंजीने तारले मिळाला 40 हजारांचा लीड

  • 04 Jun 2024 04:45 PM (IST)

    राहुल गांधी रायबरेलीतून ४ लाख मतांनी विजयी, अमेठीतून भाजपाच्या स्मृती इराणींचा पराभव

    राहुल गांधी रायबरेलीतून ४ लाख मतांनी विजयी, अमेठीतून भाजपाच्या स्मृती इराणींचा पराभव

  • 04 Jun 2024 04:05 PM (IST)

    संभाजीनगरात संदिपान भुमरेंची वाटचाल विजयाकडे 41 हजार 643 मतांची आघाडी

    संभाजीनगरात संदिपान भुमरेंची वाटचाल विजयाकडे 41 हजार 643 मतांची आघाडी

  • 04 Jun 2024 04:00 PM (IST)

    मावळमधून बारणे विजयी, वाघेरेंचा पराभव

    मावळ मतदारसंघातून गेल्यावेळी अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा परभव करणाऱ्या श्रीरंग अप्पा बारणेंनी विजयी गुलाल उधळला असून त्यांनी ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरेंचा पराभव केला आहे.

  • 04 Jun 2024 03:57 PM (IST)

    बारामतीकरांची लेकीलाच पसंती

    बारामती नणंद आणि  भावजयीच्या हाय व्होल्टेज लढतीत सुप्रिया सुळेंची बाजी मारली असून, अजित पवारांच्या पत्नी आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार पराभूत झाल्या आहेत.बारामतीत सुप्रिया सुळेंचा 1 लाख मतांनी विजय, सुनेत्रा पवारांचा मोठ्या फरकाने पराभव

  • 04 Jun 2024 03:51 PM (IST)

    14,849 मतांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आघाडीवर

    अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपाचे उमेदवार खासदार सुजय विखे यांना जोरदार झटका बसला आहे महाविकास आघाडीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांना पंधराव्या फेऱ्यांची 14849 मतांनी आघाडीवर आहेत

  • 04 Jun 2024 03:46 PM (IST)

    पुण्यातून महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ विजयी

    पुण्यातून महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी विजय मिळवला असून त्यांनी मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि वंचितचे उमेदवार वसंत मोरे यांचा पराभव केला आहे. मोहोळ यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला आहे.

  • 04 Jun 2024 03:41 PM (IST)

    शिर्डीत ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे विजयी

    शिर्डीचं तख्त ठाकरेंचा शिलेदार भाऊसाहेब वाकचौरेंनी जिंकलं असून, त्यांनी महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे आणि वंचितच्या उत्कर्षा रूपवतेंचा पराभव केला आहे.

  • 04 Jun 2024 03:34 PM (IST)

    काय म्हणतात पुणेकर विजयी होणार मोहोळ

    तेराव्या फेरीनंतर पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना 88,279 मतांची आघाडी मिळाली आहे.

  • 04 Jun 2024 03:33 PM (IST)

    स्मिता वाघांनी भाजपची लाज राखली

    जळगावमध्ये स्मिता वाघ यांनी दीड लाखांच्या फरकाने विजय मिळवला आहे. त्यांच्या या विजयामुळेभाजपला जळगावची जागा स्वतःकडे ठेवण्यात यश आले असून, वाघ यांच्या विजयामुळे भाजपची लाज राखली गेली आहे.

  • 04 Jun 2024 03:27 PM (IST)

    सुनेत्रा पवारांचा पराभव अटळ; सुळेंचा लीड काही केल्या कमी होईना

    बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवारांचा पराभव अटळ मानला जात आहेत कारण 15 व्या फेरी अखेर सुळेंनी 84080 मतांची आघाडी घेतली आहे.

follow us