Amol Mitkari : ‘ताईंच्या वक्तव्याचं समर्थन पण..,’; सुळेंच्या ‘त्या’ विधानावर मिटकरींनी सांगूनच टाकलं

Amol Mitkari : ‘ताईंच्या वक्तव्याचं समर्थन पण..,’; सुळेंच्या ‘त्या’ विधानावर मिटकरींनी सांगूनच टाकलं

Amol Mitkari : सुप्रियाताईंच्या पाठीशी अजितदादांसारखे भाऊ खंबीरपणे उभे असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी दिली आहे. महिला आरक्षण विधेयकावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी बहिणींचं कल्याण बघणारा भाऊ प्रत्येक घरात नसतो, असं विधान केलं होतं. त्यावरुन हा टोला उपमुख्यंमंत्री अजित पवार यांनाच लगावल्याचं दिसून आलं. त्यावर आता अमोल मिटकरींनी प्रतिक्रिया दिली आहे.

Women’s Reservation : ‘विरोधकांसाठी महिला सक्षमीकरणाचा मुद्दा राजकीय अजेंडाच’; Amit Shah यांची जहरी टीका

अमोल मिटकरी म्हणाले, सुप्रिया ताईंच्या वक्तव्याचं मी समर्थन करतो. प्रत्येक घरात बहिणीचं रक्षण करणारा भाऊ नसतो. पण ताई त्याला अपवाद आहेत. अजित पवार सारखे भाऊ त्यांच्या मागे खंबीर आहेत. शरद पवार यांच्यानंतर बारामती मतदारसंघात अजित पवार हे पाठिशी राहिले. त्याबाबत सुप्रिया ताई भाग्यवान असल्याचं अमोल मिटकरींनी सुप्रिया सुळेंना उद्देशून म्हटलं आहे.

Dagdusheth Halwai बाप्पांसमोर ३६ हजार महिलांनी केले सामूहिक अथर्वशीर्षाचे पठण

काय म्हणाल्या सुळे?
महिलांच्या हिताचा विचार भावांनी करावा, हे बरोबर आहे. पण प्रत्येक घरात असे भाऊ नसतात, ज्यांना बहिणीचे कल्याण व्हावे असे वाटते. प्रत्येकाचे एवढे चांगले नशीब नसते, असं सुळे महिला विधेयकावर संसदेत बोलताना म्हणाल्या आहेत.

Women’s Reservation Bill : मोदींच्या मास्टरस्ट्रोकने बदलणार लोकसभेच्या 160+ जागांवरील गणित

दरम्यान, महिला आरक्षण विधेयकावर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आपली भूमिका केली. यावेळी ते म्हणाले, फक्त महिलांनीच महिलांबाबत बोलावं, असं काही नसतं भावांनादेखील बहिणींची काळजी असतेच, असं अमित शाह म्हणाले होते, त्यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Maharashtra Rain : बाप्पाच्या स्वागताला पाऊसधारा; ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार बरसणार

महिला आरक्षण विधेयकाच्या मंजुरीसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले. अधिवेशनात महिलांना आरक्षण देण्यासंदर्भातील ‘नारी शक्ती वंदन विधेयक’ मंगळवारी लोकसभेत मांडण्यात आले होते. या विधेयकावर आज संपूर्ण दिवसभर चर्चा झाल्यानंतर चिठ्यांद्वारे मतदान झाले. आरक्षणाच्या बाजूने 454 खासदारांनी पाठिंबा दिला तर विरोधात 2 खासदारांनी मतदान केले.त्यामुळे महिला आरक्षण बहुमताने मंजूर झाले आहे.

लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के जागा देणारे महिला आरक्षण विधेयक उद्या राज्यसभेत मांडले जाणार आहे. राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपतीकडे मंजूरीसाठी पाठवले जाईल. यानंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube