Dagdusheth Halwai बाप्पांसमोर ३६ हजार महिलांनी केले सामूहिक अथर्वशीर्षाचे पठण

Dagdusheth Halwai बाप्पांसमोर ३६ हजार महिलांनी केले सामूहिक अथर्वशीर्षाचे पठण

Pune News: ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि.. असे ३६ हजार महिलांच्या मुखातून अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर उमटले. (Ganpati Ganeshotsav 2023) ऋषिपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आदिशक्तीच्या मंत्रोच्चाराने वातावरण मंगलमय आले होते.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ऋषिपंचमीनिमित्त पहाटे ३६ हजार महिलांनी उत्सव मंडपासमोर अथर्वशीर्ष पठण करण्यात आला. गणेश नामाचा जयघोष करत महिलांनी पहाटेच्या सुमारास मंगलसमयी प्रसन्नतेची अनुभूती देण्यात आली. अथर्वशीर्ष पठण या उपक्रमाचे यंदाचे ३६ वे वर्ष होते. पारंपरिक पेहरावात महिलांनी पहाटेपासून या अथर्वशीर्ष पठणासाठी उत्सव मंडपासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

उत्सव मंडपापासून ते हुतात्मा चौकापर्यंतचा परिसर महिलांच्या शिस्तबद्ध रांगेने भरून गेल्याचे बघायला मिळाले. महिलांनी शंखनाद केल्यावर ॐकार जप आणि मुख्य अथर्वशीर्ष पठण करत श्रीमंत दगडूशेठ हलवाईच्या गणरायाला नमन केले आहे. तसेच हात उंचावून टाळ्यांचा गजर करत महिलांनी गणरायाला अभिवादन केल्याचे दिसत आहे.

ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि.. असे ३६ हजार महिलांच्या मुखातून अथर्वशीर्ष पठणाचे स्वर एकाच वेळी ऐकायला मिळत होते. ऋषिपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आदिशक्तीच्या मंत्रोच्चाराने भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

Pimpri News : पंगा घेणाऱ्या थोरातांचा पत्ता कट तर, आमदार लांडगेंनाही जगतापांचा सूचक इशारा

तसेच पुण्याचे सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, अमर कोद्रे, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, राजाभाऊ घोडके, ज्ञानेश्वर रासने, विलास रासकर, उपक्रम प्रमुख शुभांगी भालेराव, अर्चना भालेराव यांसह विश्वस्त आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित दर्शवली होती.

रशिया आणि थायलंड येथून आलेल्या परदेशी भक्तांनी देखील यावेळी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. मोबाईलचा टॉर्च उंचावून देखील महिलांनी गणरायाचा जयघोष केला. तसेच पहिले २० महिलांचे पथक पहाटे २ वाजता उपस्थित झाले. तेव्हापासूनच महाराष्ट्रभरातून उपक्रमास आलेल्या महिलांची येथे येण्यास सुरुवात झाली. पारंपरिक पेहरावातील महिलांनी पहाटेपासूनच अथर्वशीर्ष पठणासाठी उत्सव मंडपासमोर गर्दी केल्याचे बघायला मिळाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube