Prakash Ambedkar : ‘भाजप-RSS कडून ईव्हीएमसारखाच देवाचाही वापर’

Prakash Ambedkar : ‘भाजप-RSS कडून ईव्हीएमसारखाच देवाचाही वापर’

Prakash Ambedkar News : आगामी निवडमुकीच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. एकीकडे एनडीए तर दुसरीकडे इंडिया आघाडीची देशभरात चाचपणी सुरु झाली आहे. याचदरम्यान, अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं (Ayodhya Ram Mandir) आयोजन करण्यात आलं आहे. ऐन निवडणुकीवेळीच राम मंदिराचा सोहळा पार पडत असल्याने वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) भाजपसह (BJP) आरएसएसवर (RSS) जळजळीत टीका केली आहे. भाजप आणि आरएसएसकडून ईव्हीएमसारखाच देवाचाही वापर होत असल्याची टीका आंबेडकरांनी केली आहे. यासंदर्भात आंबेडकरांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे.

प्रकाश आंबेडकर पोस्टमध्ये म्हणाले, मागील 10 वर्षांत भाजप-आरएसएसचे अनेक आदर्श आहेत. त्यामध्ये त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, टागोर, भगतसिंग यांना जोडले आहे. पण भाजपच्या श्रेणीत हे कोणीच नाही. आता, भाजप-आरएसएस नैतिकता आणि तत्त्वे न ठेवता आपल्या निवडणूक फायद्यासाठी राम मंदिर उद्घाटनाचा वापर करून देवाला योग्य करण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे. तसेच भाजप-आरएसएसकडून ईव्हीएमसारखा देवाचा वापर केला जात असल्याचंही आंबेडकरांनी म्हटलं आहे.

मोदींना वय विचारा! म्हणणाऱ्या नानांवर दादा चिडलेच; ‘नाक खुपसू नका, आम्ही आमचं बघू’

राम मंदिर ऐतिहासिक सोहळ्याची सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. यासोबतच अनेक मान्यवरांना निमंत्रणेही पाठवली जात आहेत. रामजन्मभूमी ट्रस्टच्यावतीने वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनाही या सोहळ्याचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे. पण, आंबेडकरांनी हे निमंत्रण नाकारत राम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचं स्पष्ट केले. आंबेडकरांनी निमंत्रण नाकारण्याचे कारणही स्पष्टपणे सांगितले आहे.

राम मंदिर सोहळा भाजप आणि आरएसएसने आयोजित केल्याचे सांगत प्रकाश आंबेडकर यांनी राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण नाकारले आहे. निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी राजकीय मोहिम म्हणून हा धार्मिक कार्यक्रम आखला गेला आहे, असं आंबेडकर म्हणाले. आंबेडकर यांनी ट्वीट करून याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज