Heera Mandi निमित्त दिग्दर्शक संजय लीला भन्साळींसाठी अमृताची खास पोस्ट

Heera Mandi निमित्त दिग्दर्शक संजय लीला भन्साळींसाठी अमृताची खास पोस्ट

Amruta Khanvilkars Special Post for Sanjay Leela Bhansali on Heera Mandi : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी ( Sanjay Leela Bhansali ) यांच्या आगामी वेबसीरीज हिरामंडीचा ( Heera Mandi ) प्रीमियर सोहळा अगदी नवाबी थाटात आणि मोठ्या दिमाखात पार पडला. अनेक कलाकारांच्या सोबतीने अमृता खानविलकरने ( Amruta Khanvilkar ) देखील या सोहळ्यात चार चाँद लावले.

Lata Deenanath Mangeshkar Award सोहळ्याचे काही खास क्षण; पाहा फोटो…

काही दिवसापूर्वी झालेल्या मुलाखतीमध्ये अमृताने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि तिने हिरामंडी च्या झगमगत्या सोहळ्यात संजय भन्साळी यांच्या सोबतचा एक फोटो आज सोशल मीडिया वर पोस्ट करून त्याला खास कॅप्शन सुद्धा दिलं आहे.

अमृता सध्या वैविध्यपूर्ण भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असून संजय भन्साळी यांच्या सोबतच्या फोटो ने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अमृता संजय भन्साळी सोबत कधी काम करणार? हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. कायम चर्चेत राहणारी अमृता सध्या झाकीर खान सोबत एका प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.

अमृता खानविलकरसाठी 2024 ठरतयं खास…

लुटेरेमधून 2024 ची बॉलिवुडमय सुरुवात करून अमृता खानविलकर पुन्हा एकदा बॉलिवुड मधल्या काही खास कलाकारांच्या सोबतीने दिसणार आहे. ती या शोमध्ये कॉमेडियन झाकीर खान सोबत दिसणार आहे. 2024 मधला आमृताचा हा दुसरा बॉलिवुड प्रोजेक्ट असून ती आता अमेझॉन मिनी टीव्ही वरच्या ‘चाचा विधायक है हमारे 3’मध्ये झळकणार आहे. लुटेरेमधली अविका ते आता चाचा विधायक है हमारे 3 मधली सुरेखा जी हा अमृताचा बॉलिवुड प्रवास अखंड सुरूच आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज