सूनेच्या आरोपांवर रामदास तडस यांचा मोठा गौप्यस्फोट; पूजाला हाताशी धरुन मला..,

सूनेच्या आरोपांवर रामदास तडस यांचा मोठा गौप्यस्फोट; पूजाला हाताशी धरुन मला..,

Ramdas Tadas On Pooja Tadas : वर्ध्याचे खासदार रामदास तडस (Ramdas Tadas) यांच्यावर त्यांचीच सुन पूजा तडस (Pooja Tadas) हिने पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी पूजा तडस यांच्यासोबत एकत्र पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पूजा तडस यांनी सासरे रामदास तडस यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. सूनेच्या आरोपांवर रामदास तडस यांनी भाष्य केलं आहे. पूजाला हाताशी धरुन मला ब्लॅकमेलिंग केल्याचा मोठा गौप्यस्फोट रामदास तडस यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

आधी ईडी आता सीबीआय! BRS नेत्या के. कविता पुन्हा गजाआड; कोणत्या प्रकरणात अटक?

रामदास तडस म्हणाले, विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे त्यामुळे त्यांनी माझ्या कुटुंबाचा मुद्दा समोर आणला आहे. विरोधकांचं षडयंत्र आहे. आमच्या परस्पर पूजा आणि पंकजचं लग्न झालं. त्यानंतर वर्ध्याला त्यांनी फ्लॅट घेतला. काही दिवसांनंतर काही समाजकंटकांनी पूजाला हाताशी धरुन ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केला. तुझ्या सासऱ्याकडे पैशांची मागणी कर, असं ब्लॅकमेलिंग केलं. त्यावेळी बोलण्याची एक कॅसेट होती, ही कॅसेट पंकजच्या हाती लागली. आणि त्यांच्यात वाद झाला. आता त्यांची कोर्टात केस सुरु असल्याचं तडस यांनी सांगितलं आहे.

‘गरिब समाजातून आलो’, मोदींच्या विधानावर पटोलेंचा सवाल, एससी, एसटींची आत्ताच आठवण का?

तसेच ज्या लोकांनी त्यावेळी ब्लॅकमेलिंग केलं ती दहा लोकं होती. त्यापैकी एकजण हत्येच्या प्रकरणात जेलमध्ये होता. तो आता जामिनावर बाहेर आहे. त्या लोकांनी षडयंत्र केलं याला मारुन टाकायचं अन् त्याच्या संपत्तीवर ताबा घ्यायचा असा सल्ला पूजाला दिला. 2020 चं प्रकरण बाहेर काढून पूजाला फॉर्म भरायला लावला ब्लॅकमेलिंग केलं माझ्याकडेही पैशांची मागणी केली माझी चूक काय? असा सवालही रामदास तडस यांनी केला आहे.

‘वंचित’च्या नादी लागू नका, आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट; आंबेडकरांचा काँग्रेसला सज्जड दम

नेमकं प्रकरण काय?
रामदास तडस यांनी स्वतःच्या मुलाला फक्त बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी माझ्याशी लग्न करून दिले. मात्र त्या घरात मला अत्यंत वाईट वागणूक दिली गेली. ज्या फ्लॅटवर मी राहते तिथे फक्त उपयोगाची वस्तू म्हणून माझा वापर केला गेला. त्यात मला झालेल्या बाळाची देखील डीएनए टेस्ट कर अशी मागणी केली गेली. त्यांच्या घरी गेले असता मला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. आता तर माझा फ्लॅट विकून मला बेघर करण्यात आलं आहे. तडस यांनी मुलाला बेदखल केल्याचं केवळ ते सांगतात. मात्र त्याला घरात ठेवून घेतात आणि मला मात्र घराबाहेर काढलं जातं, असा आरोप पूजा तडस यांनी केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज