आधी ईडी आता सीबीआय! BRS नेत्या के. कविता पुन्हा गजाआड; कोणत्या प्रकरणात अटक?
CBI Arrested K Kavitha : दिल्ली मद्य घोटाळ्या प्रकरणी सीबीआयने आता तेलंगाणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी आमदार के. कविता यांना (K. Kavitha) ताब्यात घेतले आहे. कविता सध्या तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. सीबीआयच्या एका पथकाने त्यांची चौकशी केली. मद्य घोटाळा प्रकरणात कविता यांना आधीच ईडीने अटक केली होती. मार्च महिन्यात ईडीच्या अटकेनंतर सीबीआयने कविता यांना अटक का केली असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या प्रकरणात कविता यांची एन्ट्री 1 डिसेंबर 2022 रोजी झाली होती. सीबीआयच्या एका टीमने दिल्ली मद्य घोटाळ्यात कविता यांची चौकशी केली होती. यावेळी जवळपास 7 तास त्यांची चौकशी करण्यात आली होती.
दिल्ली मद्य घोटाळ्यात के. कविता आरोपी आहेत. या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांनाही अटक झाली आहे. केजरीवाल यांच्या आधी ईडीने कविता यांना अटक केली होती. ईडीने कविता यांना अटक करण्याआधी दोन वेळेस समन्स बजावून चौकशीसाठी बोलावले होते. परंतु, त्यांना याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी या समन्सच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात जामीन याचिका दाखल केली. परंतु, कोर्टाने 19 मार्चपर्यंत या याचिकेवर सुनावणी टाळली होती. याच दरम्यान ईडीने 15 मार्च रोजी कविता यांना अटक केली.
के. कवितांनी एक वाक्य सांगताच केजरीवालांना ED नं उचललं, साऊथ लॉबीशी नेमकं कनेक्शन काय?
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली मद्य घोटाळ्यात साऊथ लॉबीचाही हात होता. यात कविता यांची महत्वाची भूमिका होती. या ग्रुपमध्ये हैदराबादमधील काही व्यापारी, वायएसआर काँग्रेसचे खासदार सुद्धा सहभागी होते. ईडीने मागील वर्षी पहिल्यांदा कविता यांना समन्स बजावले होते. आम आदमी पार्टीचे संचार विभाग प्रमुख विजय नायर यांच्या संपर्कात कविता होत्या. विजय नायरला तपास यंत्रणेने दिल्ली मद्य घोटाळ्यात अटक केली होती. यानंतर ईडीने पीएमएलएच्या कलम 3 आणि 4 नुसार मनी लाँड्रिंगच्या आरोपात कविता यांना अटक केली होती.
दरम्यान, दिल्ली दारु घोटाळा प्रकरणात काही दिवसांपूर्वीच के. कविता यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. या प्रकरणी त्यांची ईडीकडून चौकशी सुरु होती. या चौकशीत ही माहिती समोर आली असल्याचं ईडीकडून सांगण्यात आलं आहे. मद्य धोरण प्रकरणी केजरीवाल-सिसोदिया आणि के. कविता यांनी कट रचला होता. दिल्लीत अबकारी नीती 2021-22 निर्मीती भ्रष्टाचाराप्रकरणी कटाची माहिती उघड झाल्यानंतर हे धोरण रद्द करण्यात आलं.
Delhi liquor scam : के. कविता, केजरीवाल, सिसोदियांचा कट; 100 कोटीही दिले, ईडीचा दावा