Delhi liquor scam : के. कविता, केजरीवाल, सिसोदियांचा कट; 100 कोटीही दिले, ईडीचा दावा

Delhi liquor scam : के. कविता, केजरीवाल, सिसोदियांचा कट; 100 कोटीही दिले, ईडीचा दावा

Delhi liquor scam : दिल्लीतील दारु घोटाळा प्रकरणात (Delhi liquor scam) एक मोठी अपडेट समोर आली आहे. बीआरएसच्या नेत्या के. कविता (K.kavita) यांनी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, (Arvind Kejriwal) मनिष सिसोदिया यांनी मिळून दिल्ली दारु घोटाळ्याचा कट रचल्याची माहिती उघड झाली आहे. या बदल्यात के. कविता यांनी 100 कोटी रुपये दिल्याचाही दावा ईडीकडून करण्यात आला आहे.

दिल्ली दारु घोटाळा प्रकरणात काही दिवसांपूर्वीच के. कविता यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. या प्रकरणी त्यांची ईडीकडून चौकशी सुरु होती. या चौकशीत ही माहिती समोर आली असल्याचं ईडीकडून सांगण्यात आलं आहे. मद्य धोरण प्रकरणी केजरीवाल-सिसोदिया आणि के. कविता यांनी कट रचला होता. दिल्लीत अबकारी नीती 2021-22 निर्मीती भ्रष्टाचाराप्रकरणी कटाची माहिती उघड झाल्यानंतर हे धोरण रद्द करण्यात आलं.

आम्ही ठरवलं, गरज पडली तर रोजच बारामतीत येऊन बसू…; चंद्रकांत पाटलांचा मविआला इशारा

कविता आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून आम आदमी पक्षाला दिलेल्या रक्कमेपोटी नफ्यात वसुली करण्याचा कट होता. कविता आणि त्यांचे सहकारी यांनी दिलेल्या रक्कमेची वसुली करणार होते. यासोबतच नफा कमवण्याचाही त्यांचा उद्देश असल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे.

‘भाजपला सहा हजार कोटी, मग बाकीचे 14 हजार कोटी कुठे गेले?’ इलेक्टोरल बाँडवरुन शाहांचा विरोधकांना सवाल

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी आणि विधान परिषद सदस्य कविता यांना ईडीने हैदराबादमधून अटक केली. कविता 23 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत आहेत. या कारवाईनंतर ईडीची टीम त्याची सतत चौकशी सुरु आहे. कविता यांच्यासह इतर सहकाऱ्यांनी दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाच्या निर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये फायदा मिळवण्यासाठी केजरीवाल आणि सिसोदिया यांच्यासह आपच्या प्रमुख नेत्यांसोबत कट रचला असल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, याआधी कविता यांच्या कोठडीबाबत पीएमएलए न्यायालयाला सांगितले की, दिल्ली उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याची मुख्य सूत्रधार आणि लाभार्थी होती. तर कविता यांनी काहीही चुकीचे केले नसल्याचे कविताने म्हटले होते. केंद्र सरकार ईडीचा वापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी भाजप ईडी आणि सीबीआयचा वापर करत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज