आम्ही ठरवलं, गरज पडली तर रोजच बारामतीत येऊन बसू…; चंद्रकांत पाटलांचा मविआला इशारा
Loksabha Election 2024 : मविआकडून बारामतीतून (Baramati) सुप्रिया सुळे (Supriya Sule) निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या विरोधात सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार आहेत. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) मतदारसंघात चांगल्याच सक्रीय झाल्यात. आता भाजपनेही बारामतीत अजित पवारांच्या (Ajit Pawar) उमेदवारांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली. मंत्री चंद्रकात पाटील (Chandrakat Patil) यांनी तर बारामतीत रोजच येऊन बसणार असल्याचा इशारा देत महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी करू, असा निर्धार केला.
ठाकरे गटाचे नेते अंबादास दावनेंचं विरोधी पक्षनेतेपद जाणार? कसं आहे विधानपरिषदेचं गणित?
रविवारी (दि. 17) बारामतीत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महायुतीची समन्वय बैठक झाली. या बैठकीत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी तिन्ही घटक पक्षांनी संघटित होऊन संघ म्हणून काम करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. यासाठी गरज पडली तर रोजच बारामतीत येऊन स्वतः बुथ स्तरावर काम करणार. ज्यांना विरोधी पक्षाचे काम करायचे आहे त्यांनी पक्ष सोडून ते काम करावे, त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश मिळणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
‘शिवतीर्था’वर ‘इंडिया आघाडी’ची तोफ धडाडणार! ‘हा शिवसेनेसाठी काळा दिवस’ CM शिंदेंची बोचरी टीका
विरोधी पक्षांचे रात्रीच्या अंधारात काम करायचे व दिवसा आमच्याबरोबर राहायचं, आमचं सरकार आल्यानंर योजनांचा लाभ घेण्यासाठी आमच्याकडे यायचं, असं अजिबात चालणार नाही, असं चंद्रकांत पाटलांनी ठणकावलं.
ते म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नरेंद्र मोदींना शब्द देऊन ऐनवेळेस माघार घेतली व नरेंद्र मोदींचा अपमान केला. त्या अपमानाचा आणि फसवणुकीचा बदला घेण्याची संधी आहे. त्यामुळं सर्वांनीच घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबबून मोदींना पीएम करण्यसाठी बारामतीच्य महायुतीचा उमेदवार निवडणून देण्यासाठी प्रयत्न करावे, असं पाटील म्हणाले.
यावेळी राहुल कुल, वासुदेव काळे, संदीप खर्डेकर, प्रदीप गारटकर, रुपाली चाकणकर, सुरेश घुले, बाळासाहेब गावडे, नवनाथ पडळकर, जालिंदर कामठे, पृथ्वीराज जाचक, वैशाली नागवडे, सुरेंद्र जेवरे, पांडुरंग कचरे, बाबाराजे जाधव आदी पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते.
48 जागा जिंकणं अवघड राहणार नाही
कालच निवडणूक आयोगाने निवडणुकीचे वेळापत्रक घोषित केलं. आजपासून सगळ्या राजकीय पक्षांच्या गतविधीला जोर येणार आहे. महाराष्ट्रात भाजपने ठरवलं आहे की, आपण पुढाकार घेऊन सगळ्या पक्षांचा समन्वय राखला गेला पाहिजे. माझ्याकडे तीन लोकसभा मतदारसंघाच्या जबाबदारी आहे. बारामती, शिरूर आणि पुण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. महायुतीच्या घटक पक्षांचा समन्यवय नीट झाला तर 48 च्या 48 जागा जिंकणं अवघड राहणार नाही, असं पाटील म्हणाले.