ठाकरे गटाचे नेते अंबादास दावनेंचं विरोधी पक्षनेतेपद जाणार? कसं आहे विधानपरिषदेचं गणित?

ठाकरे गटाचे नेते अंबादास दावनेंचं विरोधी पक्षनेतेपद जाणार? कसं आहे विधानपरिषदेचं गणित?

Ambadas Danave: शिवसेनेतील बंडखोरीनंतरउद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांच्यापुढं झालेल्या अडचणी काही कमी होत नाहीत. काहीच दिवसांपूर्वी रवींद्र वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. तर आता विधान परिषदेतील आमदार आमशा पाडवी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटाचे विधान परिषदेतील संख्याबळ एकाने कमी झाले आहे. परिणामी, कॉंग्रेसचं संख्याबळ जास्त झालं. त्यामुळं ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danave) यांचे पद धोक्यात येत आहे.

Ram Charan : ग्लोबल स्प्रिचुअलिटी महोत्सवात राम चरणची पत्नी उपासनाची राष्ट्रपती मुर्मुंशी भेट! 

सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू सुरू झाली असतांना येत्या तीन महिन्यांत विधान परिषदेचे 21 आमदार निवृत्त होणार आहेत.

विधानपरिषदेतील सध्याच्या संख्याबळावर नजर टाकल्यास ठाकरे गटाकडे सध्या फक्त 7 आमदार आहेत, मात्र त्यातील 3 आमदारांचा कार्यकाळ जून आणि जुलैमध्ये संपणार आहे. त्याचबरोबर काँग्रेसकडे सध्या 8 आमदार आहेत. यातील 2 आमदारांचा कार्यकाळ जुलै महिन्यात संपत आहे. तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे तीन आमदार आहेत.

येत्या तीन महिन्यांत म्हणजे जुलै महिन्यापर्यंत विधान परिषदेचे 21 आमदार हळूहळू निवृत्त होतील. यामुळे संख्याबळ आणखी कमी होईल. त्यामुळे दानवे यांचं विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद धोक्यात आलं आहे.

‘मुख्य प्रवाहात आणून ते सोडत असतील तर दुर्देव’; आमश्या पाडवींच्या प्रवेशावर राऊतांची टीका 

जुलै महिन्यानंतर ठाकरे गटाकडे 4, काँग्रेसकडे 6 आणि राष्ट्रवादीचे शरद पवार गटाकडे 3 आमदार असतील. त्यामुळे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून जाणार आहे. ठाकरे गटापेक्षा काँग्रेसकडे दोन आमदार जास्त असल्याने विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसकडून दावा केला जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे दानवे यांचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात असल्याची चर्चा आहे.

सध्या विरोधी पक्षातील आमदारांची संख्या आहे
ठाकरे – 7
काँग्रेस- 8
राष्ट्रवादी शरद पवार गट-3

जुलै महिन्यानंतर कसे असेल संख्याबळ
ठाकरे गट – 4
काँग्रेस- 6
राष्ट्रवादी शरद पवार गट-3

आमदारांचा कार्यकाळ कधी संपणार?
काँग्रेस विधानपरिषद आमदार
जयंत आसगावकर – 6 डिसेंबर 2026
भाई जगताप – 7 जुलै 2028
सतेज पाटील – 1 जानेवारी 2028
वजाहत मिर्झा – 27 जुलै 2024
राजेश राठोड – 13 मे 2026
धीरज लिंगाडे – 7 फेब्रुवारी 2029
अभिजीत वंजारी – 6 डिसेंबर 2026
प्रज्ञा सातव- 27 जुलै 2024

ठाकरे गट
सचिन अहिर- 7 जुलै 2028
उद्धव ठाकरे – 13 मे 2026
नरेंद्र दराडे – 21 जून 2024
अंबादास दानवे – 21 ऑगस्ट 2025
अनिल परब – २७ जुलै २०२४
विलास पोतनीस – ७ जुलै २०२४
सुनील शिंदे – 1 जुलै 2028

शरद पवार गट
शशिकांत शिंदे – 13 मे 2026
एकनाथ खडसे – 7 जुलै 2028
अरुण लाड – 6 डिसेंबर 2026

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज